जगात हाहाकार! मोठी विमान दुर्घटना, इतक्या लोकांचा गेला जीव, एका क्षणातच..

एअर ट्रॅफिक कंट्रोलसोबत संपर्क तुटल्याने लष्काराच्या विमानाचा भीषण अपघात झाला. यात तब्बल 25 प्रवासी आणि कर्मचारी होते. 32 लोकांचा जीव या अपघातात गेल्याची माहिती मिळतंय. या घटनेने मोठी खळबळ उडाली.

जगात हाहाकार! मोठी विमान दुर्घटना, इतक्या लोकांचा गेला जीव, एका क्षणातच..
Nigerian military aircraft
| Updated on: Oct 06, 2026 | 7:43 AM

नुकताच एक धक्कादायक घटना घडली. या घटनेने मोठी खळबळ उडाली. एअर ट्रॅफिक कंट्रोलसोबत संपर्क तुटल्याने लष्काराच्या विमानाचा भीषण अपघात झाला. यात तब्बल 25 प्रवासी आणि कर्मचारी होते. 32 लोकांचा जीव या अपघातात गेल्याची माहिती मिळतंय. दुबईहून तेल अवीवकडे निघालेल्या फ्लायदुबईच्या विमानात मोठी घटना घडली. भारतीय पायलट स्मित मच्छार यांच्या धैर्याने आज 180 लोक जिवंत आहेत. को पायलटने मोठा हल्ला स्मित मच्छार यांच्यावर केला. गंभीर जखमी असूनही त्यांनी हार मानली नाही आणि कॉकपिटचा दरवाजा उघडला. त्यानंतर प्रवाशांनी ओमानी को पायलटला ताब्यात घेतले. या घटनेने जगाची झोप उडाली. ही घटना ताजी असतानाच पुन्हा धक्कादायक घटना घडली. लष्काराच्या विमानाता भीषण अपघात झाला.

एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला आणि नायजेरियाच्या लष्कराच्या विमानाचा भीषण अपघात झाला. बेनिन सिटीहून लागोसला जाणारे नायजेरियन लष्करी विमान नैऋत्येकडील ओंडो राज्यात कोसळले. ज्यात 25 प्रवासी आणि सात कर्मचारी होते, त्यांचा जीव गेला. या अपघातात काही स्थानिक नागरिकही गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळतंय.

Loading...

नागरी उड्डाण मंत्री फेस्टस कियामो यांनी सांगितले की, सोमवारी बेनिन सिटीहून लागोसकडे नियमित मोहिमेवर असताना हवाई दलाच्या एटीआर 42 या विमानाचा हवाई वाहतूक नियंत्रकांशी असलेला संपर्क तुटला. हा एक भीषण अपघात म्हणून याकडे बघितले जाते. मागच्या काही वर्षातील हा मोठा भीषण अपघात म्हणून या अपघाताकडे बघितले जात आहे.

या अपघातात कोणीही वाचले नसल्याची खात्री झाल्यानंतर नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष बोला टिनुबू यांनी दुःख व्यक्त केले. विमानातील कुटुंबियांबद्दल संवेदनशिलता व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर इग्बोकोडा या किनारी शहरालगत विमानाचा ढिगारा आढळून आला. तिथे शोध आणि बचाव पथके तैनात करण्यात आली होती. मात्र, या घटनेने मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळत आहे. हा एक मोठा विमान अपघात आहे. विमानातील एकही व्यक्ती जिंवंत राहू शकला नाही. हळहळ व्यक्त केली जातंय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us