AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगात खळबळ! उत्तर कोरियाने धाडधाड मिसाइल्स डागल्या, थेट आणीबाणी जाहीर झाल्याने जग हादरले!

उत्तर कोरियाने समुद्राच्या दिशेने थेट मिसाईल्स डागल्या आहेत. किम जोंग उन यांच्या या निर्णयाने जगभरात खळबळ उडाली आहे. जपानमध्ये राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

जगात खळबळ! उत्तर कोरियाने धाडधाड मिसाइल्स डागल्या, थेट आणीबाणी जाहीर झाल्याने जग हादरले!
kim jong unImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 19, 2026 | 3:53 PM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष अजूनही थांबलेला नाही. इराणने अगोर होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली होती. इस्रायल आणि हेजबोला यांच्यात दहा दिवसांच्या शस्त्रसंधीची घोषणा झाल्यानंतर इराणने हा निर्णय घेतला होता. परंतु आता पुन्हा एकदा इराणने होर्मुझचा जलमार्ग बंद केला आहे. अमेरिका जोपर्यंत इराणशी संबंधित जहाजांवरील नाकेबंदी हटवणार नाही, तोपर्यंत ही सामुद्रधुनी बंदच असेल, असा आक्रमक पवित्रा इराणने घेतला आहे. असे असतानाच आता जगाला हादरवणारी नवी घटना समोर आली आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उन यांनी धाडधाड बॅलेस्टिक मिसाइल्स डागल्या आहेत. या धक्कादायक निर्णयानंतर आता जपानने थेट राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे.

उत्तर कोरियाने डागल्या मिसाईल्स

मिळालेल्या माहितीनुसार उत्तर कोरियाने अनेक बॅलेस्टिक मिसाईल्स डागल्या आहेत. या घटनेनंतर दक्षिण कोरियाने तत्काळ बैठक बोलावली तर दुसरीकडे जपानने राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली. उत्तर कोरियाच्या या हल्ल्यानंतर जपानच्या पंतप्रधान कार्यालयाने एक्स समाजमाध्यमावर एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये उत्तर कोरियाने डागलेल्या मिसाईल्सबद्दल सांगण्यात आले आहे. उत्तर कोरियाने डागलेल्या या मिसाईल्स कमी पल्ल्याच्या आहेत. उत्तर कोरियाने या मिसाईल्सची चाचणी केल्याचे म्हटले जात आहे. काही दिवसांपूर्वीच संयुक्त राष्ट्रांनी उत्तर कोरियाचा अण्वस्त्रनिर्मितीचा कार्यक्रम हा चिंताजनक आहे, असे मत व्यक्त केले होते. असे असतानाही उत्तर कोरियाने या बॅलेस्टिक मिसाईल्सची चाणणी केली आहे.

दक्षिण कोरिया, जपानने नेमकं काय केलं?

दुसरीकडे उत्तर कोरियाने या मिसाईल्स डागल्यानंतर दक्षिण कोरियाचे संयुक्त चिफ ऑफ स्टाफने भूमिका स्पष्ट केली. उत्तर कोरियाने सिन्पो क्षेत्रातील समुद्राच्या दिशेने या मिसाईल्स डागल्या आहेत. क्षेपणास्त्र डागल्यानंतर त्या 140 किलोमीटर दूरपर्यंत गेल्या. उत्तर कोरियाने केलेल्या कोणत्याही कारवाईला उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत. आम्ही या हल्ल्याबाबत जपान आणि अमेरिकेला सर्व माहिती देत आहोत, असे दक्षिण कोरियाने सांगितले आहे.

दरम्यान, आता उत्तर कोरियाच्या या कृत्यानंतर संयुक्त राष्ट्र, अमेरिका नेमकी काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...