
Nuclear War : जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर अमेरिकेने 80 वर्षांपूर्वी अणुबॉम्ब टाकला होता. त्यात ही शहरं बेचिराख झाली होती. त्यात लाखो लोकं मारल्या गेली. त्यानंतर अणु बॉम्बचा वापर कोणत्याच देशांनी केला नाही. पण रशियाच्या या बाबा वेंगाने अणु युद्धाचा धोका कमी झाला नसून या दोन देशात अणु युद्ध होण्याचा दावा केला आहे. जगात रशिया आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढलेला असतानाच तिच्या या दाव्याने जगभरात खळबळ उडाली आहे.
बुल्गेरियाच्या बाबा वेंगा ही प्रसिद्ध भविष्यवेत्ता होऊन गेली. तिने यापूर्वी जगातील अनेक घडामोडी कवितेच्या रुपात सांगितल्या आणि तिच्या अनुयायांनी त्या लिहिल्या. त्या आधारे जगातील अनेक घडामोडींशी त्याचा संबंध जोडण्यात येतो. 9/11 दहशतवादी हल्ला असो वा इतर भाकीतं असोत बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरल्याचे सांगण्यात येते. त्यातच 2025 मध्ये महायुद्धाला सुरुवात होईल असे तिचे एक भाकीत चर्चेत आहेत. जगात अनेक भागात ताण-तणाव सुरू आहे. त्यातच डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ कार्डने अनेक देश नाराज आहेत. रशियाविरुद्ध अमेरिका अशा दोन खेम्यात जगाची लवकरच विभागणी होण्याची भीतीही अर्थतज्ज्ञ व्यक्त करत आहे. त्यातच आता मॉस्कोच्या या बाबा वेंगाने अणु युद्धाविषयी मोठे भाकीत वर्तवले आहे.
मार्गारीटा सिमोन्यान यांच्या दाव्याने खळबळ
मार्गारीटा सिमोन्यान (Margarita Simonyan) या काही हवेत तिरंदाजी करणारी महिला नक्कीच नाही. कारण त्या एक पत्रकार, संपादक आणि एका मीडिया हाऊसच्या मालकीण आहेत. रशियन सरकारच्या अधिकृत सरकारी वृत्तवाहिनी RT च्या मुख्य संपादिका आहेत. रशिया सेगोडन्या( Rossiya Segodnya) हा त्यांच्या मालकीचा माध्यम समूह आहे. त्यांनी रशिया आणि अमेरिका या देशात लवकरच अणु युद्ध होणार असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याकडे संपूर्ण जग गांभीर्याने पाहत आहेत.
कधी होणार अणुयुद्ध?
रशिया जगाचा शत्रू असल्याचा जो कांगावा अमेरिका करत आहे, तो फार काळ चालणार नाही. हा युक्रेन आणि रशिया असा वाद नाही तर रशिया आणि पश्चिमी देश असा वाद आहे. युक्रेनच्या आडून अमेरिका नाहक खेळी खेळत आहे. जर अमेरिकेने ही खेळी बंद केली नाही तर दोन्ही देशात अणु युद्धाचा धोका नाकारता येणार नाही. शक्यतोवर याच हिवाळ्यात हा सामना दिसू शकतो, असा दावा मार्गारीटा सिमोन्यान यांनी व्यक्त केला. एका मुलाखती दरम्यान त्यांनी रशिया, युरोप आणि अमेरिका यांच्यातील संबंधावर भाष्य केले.
क्युबातील मिसाईल संघर्षापेक्षा यावेळचा संघर्ष धोकादायक असेल. हे शीत युद्धाचा दुसरा भाग नाही तर प्रत्यक्ष संघर्ष होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. मला चांगलं माहिती आहे की, क्युबातील क्षेपणास्त्र संघर्षात कोणाचाच जीव गेला नाही. दोन्ही बाजूने शुन्य नुकसान झाले होते. पण आता तसे नक्कीच होणार नाही. युक्रेन आणि रशियात जमीन वाद सहमती मिटू शकतो. ट्रम्प हे नाटोला आतून पोखरत असल्याचा आरोपही मार्गारीटा सिमोन्यान यांनी केला आहे. चर्चा आणि सामंजस्याने युद्धाचे ढग पांगतील पण शिरजोरी करणे अयोग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.