लॉरेन्स बिश्नोई गँगला जबरदस्त झटका; ‘ऑपरेशन हार्ड बॉल’मध्ये 24 जणांना अटक

अमेरिकेने लॉरेन्स बिश्नोई गँगविरोधात ‘ऑपरेशन हार्ड बॉल’ अंतर्गत मोठी कारवाई सुरू केली आहे. अमेरिका, कॅनडा आणि युरोपमध्ये २४ जणांना अटक करण्यात आली असून, खंडणी, अमली पदार्थ तस्करी, हत्या यांसारख्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्कचा पर्दाफाश झाला आहे. लॉरेन्स बिश्नोई तुरुंगातूनच हे जागतिक रॅकेट चालवत असल्याचा अमेरिकेच्या न्याय विभागाचा आरोप आहे.

लॉरेन्स बिश्नोई गँगला जबरदस्त झटका; ऑपरेशन हार्ड बॉलमध्ये 24 जणांना अटक
लॉरेन्स बिश्नोई
| Updated on: Jul 08, 2026 | 8:18 AM

कुख्या त गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या गँगचं आता काही खरं नाही. अमेरिकन अधिकाऱ्यांनी लॉरेन्स बिश्नोई गँगविरोधात सर्वात मोठी कारवाई सुरू केली आहे. अमेरिका, कॅनडा आणि युरोपमध्ये 24 लोकांना अटक करण्यात आली आहे. अनेक देशांमध्ये हत्या, खंडणी, अमली पदार्थांची तस्करी, अपहरण, शस्त्रास्त्रांशी संबंधित गुन्हे आणि इतर संघटित गुन्ह्यांमध्ये गुंतलेल्या नेटवर्कला ‘ऑपरेशन हार्ड बॉल’ या मोहिमेद्वारे, लक्ष्य करण्यात आलं, अशी माहिती समोर आली आहे.
अमेरिकेच्या न्याय विभागाने (DOJ) दिलेल् यामाहितीनुसार, अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या तपासाचा भाग म्हणून अधिकाऱ्यांनी कॅलिफोर्निया, इंडियाना, जॉर्जिया, कॅनडा आणि स्पेनमध्ये 50 हून अधिक शोध वॉरंट्सची अंमलबजावणी केली आणि संशयितांना अटक केली.

भारतात कार्यरत असलेल्या तीन संघटित गुन्हेगारी गटांशी संबंधित प्रकरणांमध्ये 37 व्यक्तींवर तीन स्वतंत्र संघीय आरोपांनुसार (indictments) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असं या समन्वित कारवाईची घोषणा करताना न्याय विभागाने (DOJ) सांगितलं. यापैकी 24 जणांना अटक करण्यात आली आहे, तर 10 जण अद्याप फरार आहेत.

अमेरिकेत लॉरेन्स बिश्नोईवर आरोप निश्चिती

तीनपैकी एक फेडरल आरोप हा, सध्या तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईशी संबंधित आहे. तो भारतीय तुरुंगातूनच गुन्ह्यांचे एक जागतिक नेटवर्क चालवत असल्याचा अमेरिकन सरकारी वकिलांचा आरोप आहे. या आरोपपत्रानुसार, लॉरेन्स बिश्नोईने अनेक देशांमध्ये कथित राजकीय हत्या, खंडणी, अपहरण, अमली पदार्थांची तस्करी, मानवी तस्करी आणि इतर गुन्हेगारी कृत्ये घडवून आणण्यासाठी बेकायदेशीर मोबाईल फोन आणि इंटरनेट-आधारित दळणवळण साधनांचा वापर केला होता.

गोल्डी ब्रार (या सिंडिकेटचा उत्तर अमेरिकेतील प्रमुख म्हणून वर्णन) आणि रोहित गोदारा (जो युरोपमधील कारवायांचे व्यवस्थापन करत होता ) अशी त्याच्या मुख्य साथीदारांची नावेही सरकारी वकिलांनी नमूद केली आहेत. या दोघांनीही भारताबाहेरून टोळीच्या कारवायांचे नियोजन व समन्वय साधण्यास मदत केल्याचं आरोपपत्रात म्हटलं आहे. तसेच या संघटनेने पीडितांना- विशेषतः भारतीय वंशाच्या लोकांना धमकावण्यासाठी हिंसाचाराचा वापर केला असाही अमेरिकन सरकारी वकिलांचा आरोप आहे. एवढंच नव्हे तर आपला प्रभाव वाढवण्यासाठी त्यांनी सोशल मीडिया आणि ऑनलाइन पोस्ट्सद्वारे आपली गुन्हेगारी प्रतिमा पसरवल्याचेही म्हटले आहे.

लावले अनेक आरोप

या आरोपांमध्ये जून 2023 मध्ये ब्रिटिश कोलंबियातील सरे (Surrey) येथे एका प्रमुख राजकीय आणि धार्मिक नेत्याच्या हत्येचा समावेश आहे. बिश्नोई आणि ब्रार यांनी या हत्येचे आदेश दिले होते, असा आरोप सरकारी वकिलांनी केला. मात्र हे आरोप अद्याप सिद्ध झालेले नसून त्यांची न्यायालयात पडताळणी केली जाईल. बिश्नोईच्या संघटनेने आंतरराष्ट्रीय कोकेन तस्करी आणि खंडणीद्वारे आपल्या कारवायांसाठी निधी उभारल्याचा आरोप अमेरिकेच्या न्याय विभागाने लावला आहे.

या टोळीतील सदस्यांनी WhatsApp सारख्या ‘एनक्रिप्टेड’ मेसेजिंग प्लॅटफॉर्मवरून पीडितांना धमकावले, असं सरकारी वकिलांचं म्हणणं आहे. पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांवर हिंसाचार करण्याची धमकी देऊन त्यांनी लाखो डॉलर्सची मागणी केली. तसेच, या टोळीने अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या प्रतिस्पर्धी गटांकडून कोकेनचा साठा चोरल्याचा आणि अमेरिका व कॅनडा दरम्यान अमली पदार्थांची तस्करी केल्याचा आरोपही लावण्यात आला आहे.

Follow Us