भारत-पाक युद्धविराम माझ्याचमुळे! ट्रम्प पुन्हा फार्मात, श्रेयाचे लोणी पुन्हा अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या हाती 

India Pakistan Ceasefire : भारत आणि पाकिस्तानमध्ये चार दिवस तणाव होता. भारताने पाकिस्तानला गुडघ्यावर आणले. त्यांचे मोठे नुकसान झाले. हे भांडण आपल्यामुळेच मिटल्याचा श्रेय पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतले. त्यावरून सध्या देशात राजकारण तापले आहे.

भारत-पाक युद्धविराम माझ्याचमुळे! ट्रम्प पुन्हा फार्मात, श्रेयाचे लोणी पुन्हा अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या हाती 
डोनाल्ड ट्रम्प यांची श्रेयासाठी धडपड
Image Credit source: गुगल
| Updated on: May 22, 2025 | 8:56 AM

Donald Trump : अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी दावा केला की, त्यांच्या मध्यस्थीमुळेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव दूर झाला. व्यापाराचे कारण पुढे करत आपण हा संघर्ष थांबवल्याचा दावा ट्रम्प यांनी पुन्हा केला. ट्र्म्प यांनी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरील रामफोसा यांच्यासोबत त्यांनी बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी हा दावा केला. विशेष म्हणजे वंशवादाच्या मुद्दावरून ट्रम्प यांचे रामफोसा यांच्याशी वाद दिसून आला.

अमेरिका भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांशी अमेरिकेचा व्यापार चालतो. आम्ही सुरुवातीला हा मुद्दा सामोपचाराने मिटवण्याचा प्रयत्न केला. त्याला यश येते ने येते तोच पुन्हा दोघांमध्ये वाद पेटला, हे सांगणे माझ्यासाठी खेदजनक असल्याचे ते म्हणाले. ही आपली चूक असल्याचे ते म्हणाले. त्यानंतर बुधवारी दावा केला की, त्यांच्या मध्यस्थीमुळेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव दूर झाला.

दोन्हीकडील नेते महान

ट्र्म्प म्हणाले की, दोन्हीकडील नेते चांगले आणि महान आहेत. दोन्ही देशातील लोकही चांगले आहेत. पण भारत हा त्यांचा खास मित्र आहे. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती रामफोसा म्हणाले की, मोदी हे दोन्ही देशाचे सारखेच मित्र आहेत. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा त्यांच्यामुळेच युद्ध थांबल्याचा दावा करताना दिसले. या दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ट्रम्प हे श्रेयवादासाठी आसूलेले दिसले.

दोन्ही देशात युद्ध विरामाची अधिकृत माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून दिली होती. त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. विशेष म्हणजे त्यानंतर दोन्ही देशांनी युद्धविरामाबाबत भूमिका जाहीर केली होती. त्यानंतरही त्यांनी माध्यमांसमोर आपल्यामुळेच हे सर्व घडून आल्याचा दावा केला होता.

भारतात राजकारण तापले

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या या भूमिकेनंतर विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. पाकिस्तान आणि भारत यांच्यात युद्ध विराम झाला, त्याचे कारण स्पष्ट करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर ट्रम्प यांनी घुमजाव केले. अनेक जण हा संघर्ष थांबण्यामागे आखातातील देश असल्याचा दावा करत आहेत. तर मोदी समर्थक भारताने पाकिस्तानला इंगा दाखवल्यानंतर इतर देशांच्या दबावाखाली पाक नाक घासत आल्याचा दावा कर आहेत. आता त्यात ट्रम्प तात्यांनी पुन्हा एकदा श्रेयाचे लोणी खाल्ल्याने वातावरण तापले आहे.