जग हादरलं! डोनाल्ड ट्रम्प यांचा कहर, तब्बल 3 लाखाहून अधिक नोकऱ्या धोक्यात, विद्यार्थी..

US visa rule changes : डोनाल्ड ट्रम्प भारताला अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मोठा टॅरिफ लावल्यानंतरही त्यांनी H-1B व्हिसाच्या नियमात बदल केला. आता त्यांच्या नजरा आहेत, त्यामध्ये विद्यार्थी व्हिसाकडे.

जग हादरलं! डोनाल्ड ट्रम्प यांचा कहर, तब्बल 3 लाखाहून अधिक नोकऱ्या धोक्यात, विद्यार्थी..
Donald Trump
| Updated on: Oct 02, 2025 | 12:52 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून व्हिसाच्या नियमात सतत बदल करताना दिसत आहेत. H-1B व्हिसावर अत्यंत मोठे शुल्क लावण्यात आले. आता H-1B व्हिसासाठी तब्बल 88 लाख रूपये शुल्क भरावे लागेल. यासोबतच त्यांनी L-1 व्हिसातही बदल केली आहेत. भारतीय मोठ्या संख्येने अमेरिकेत H-1B व्हिसावर राहतात. नवीन नियमानंतर मोठा धक्का भारतीयांना बसला. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या प्रस्तावित विद्यार्थी व्हिसा नियमांविरुद्ध उघड निषेध सुरू केला आहे. विद्यार्थी व्हिसावरही डोनाल्ड ट्रम्प प्रशासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

H-1B व्हिसाच्या नियमातील बदलानंतर विद्यार्थी अडचणीत 

डोनाल्ड ट्रम्प यांनी विद्यार्थी व्हिसाचे नियम बदलले तर आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी संधी मर्यादित होतील, यामुळेच अमेरिकेतील विद्यार्थी आणि विद्यापीठ नवीन नियमांना विरोध करत आहेत. जर हे नियम बदलले तर अमेरिकन विद्यापीठांमधील स्पर्धा देखील कमी होईल, यासोबतच याचा थेट परिणाम हा देशाच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. कारण जगातून अनेक विद्यार्थी अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्यासाठी येतात.

विद्यार्थी व्हिसाच्या नियमातील बदलाला अमेरिकेतून विरोध 

विद्यार्थी व्हिसावरील बदलामुळे F-1 विद्यार्थी व्हिसासाठी दीर्घकालीन कालावधीची स्थिती (D/S) धोरण रद्द होईल. त्याऐवजी, F-1 (विद्यार्थी) आणि J-1 एक्सचेंज व्हिजिटर व्हिसाची मर्यादा जास्तीत जास्त चार वर्षांपर्यंत मर्यादित करण्याचा प्रस्ताव आहे. नवीन नियमाला विरोध होण्याचे कारणही तेवढेच मोठे आहे. आकडेवारीनुसार, अमेरिकेचे विद्यार्थी पदवी घेण्यासाठी चारपेक्षा अधिक वर्ष घेतात. नवीन नियमानुसार, बॅंकलॉग होऊ शकतो.

अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत 44 अब्ज डॉलर्सचे योगदान

आकेडवारीनुसार, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत अंदाजे 44 अब्ज डॉलर्सचे योगदान दिले. यावर 3.80.000 नोकऱ्या आधारित आहेत. अमेरिकन कौन्सिल ऑन एज्युकेशन आणि इतर 53 उच्च शिक्षण संस्थांनी विद्यार्थी व्हिसातील नवीन बदलांना दोषपूर्ण नियम म्हटले आहे जे अस्तित्वात नसलेल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. हा मोठा धक्का आहे. सातत्याने याला विरोध होताना दिसतोय. व्हिसाच्या नियमातील बदलामुळे अमेरिकेतील नोकऱ्या देखील धोक्यात आल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.