AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर चीनने रंग दाखवले, पाकिस्तानसाठी उतरला मैदानात, भारतावर चालवण्यासाठी दिलं हे घातक मिसाइल

Pahalgam Terror Attack सध्याच्या परिस्थितीत चीनने एक पाऊल उचललय. भारतासाठी ही चिंताजनक बाब आहे. कारण चीनने अशावेळी तटस्थ राहण गरजेच असताना त्यांनी पाकिस्तानला भारतावर चालवण्यासाठी एक घातक शस्त्र दिलं आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे तणाव टोकाला पोहोचला आहे.

अखेर चीनने रंग दाखवले, पाकिस्तानसाठी उतरला मैदानात, भारतावर चालवण्यासाठी दिलं हे घातक मिसाइल
Pakistan-ChinaImage Credit source: TV9 Hindi
| Updated on: Apr 26, 2025 | 2:22 PM
Share

सध्या भारत-पाकिस्तानमध्ये मोठा तणाव आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर खवळलेला भारत कसा बदला घेणार? हीच भिती पाकिस्तानला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी पडलेल्या पाकिस्तानच्या मदतीला अखेर चीन धावून आला आहे. चीनने सवयीप्रमाणे आपले खरे रंग दाखवले आहेत. चीनने पाकिस्तानला 100 पेक्षा जास्त PL-15 लॉन्ग रेंज एअर टू एअर हल्ला करु शकणारी (VLRAAM) मिसाइल्स दिली आहेत. हा तणाव कुठल्याही क्षणी मोठ्या युद्धात बदलू शकतो, हा त्यामागचा संदेश आहे. या मिसाइल्सची रेंज 200 किलोमीटर असल्याच सांगितलं जातं. PL-12 पेक्षा ही रेंज अधिक आहे. JF-17 मधून PL-12 ची 100 किलोमीटर रेंज आहे.

पाकिस्तानी एअरफोर्सने PL-15 एयर-टू-एयर मिसाइल (VLRAAM) JF-17 थंडर ब्लॉक-3 मध्ये फिट केलं आहे. विंग टिप्सवर PL-10E WVRM HOBS सक्षम मिसाइल दिसतेय. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान पाकचे परराष्ट्र मंत्री आणि चिनी डिप्लोमॅट्सची बैठक झाली. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी चीनचे आभार सुद्धा मानले आहेत.

तणावाने टोक गाठलेलं असताना पाकिस्तानला मदत

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन माहिती दिली की, चिनी राजदूत जियांग जैदोंग यांनी उपपंतप्रधान/परराष्ट्र मंत्री सीनेटर मोहम्मद इशाक डार यांच्याशी चर्चा केली. दोघांनी सधाच्या परिस्थितीवर चर्चा केली. अलीकडच्या काही वर्षात पाकिस्तान आणि चीनमध्ये रणनितीक भागिदारी अधिक दृढ झाली आहे. तणावाने टोक गाठलेलं असताना चीनने पाकिस्तानला ही मदत केली आहे.

पाकिस्तानसाठी या वीटो पावरचा अधिकार वापरला

भारताविरुद्ध लढाई एकट्या पाकिस्तानला पेलवणारी नाही. त्यामुळे ते नेहमीच चीनकडे हात पसरतात. आता सुद्धा त्यांनी तेच केलय. चीनने शस्त्रास्त्र देण्यापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर नेहमीच पाकिस्तानची पाठराखण केली आहे. चीनकडे संयुक्त राष्ट्रात वीटो पावर आहे. चीनने अनेकदा पाकिस्तानसाठी या वीटो पावरचा अधिकार सुद्धा वापरला आहे.

पॅन्ट्स कमरेच्या खाली खेचलेल्या होत्या

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांची अत्यंत क्रूरतेने हत्या करण्यात आली. आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जवळपास 20 मृतांच्या पॅन्ट्स कमरेच्या खाली खेचलेल्या होत्या. त्या पॅन्ट्सची चैन खुली होती. सर्वप्रथम घटनास्थळी जाऊन हे 26 निष्प्राण देह पाहणाऱ्या टीमच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही गोष्ट आली. पर्यटकांची हत्या करण्यापूर्वी दहशतवाद्यांनी त्यांचा धर्म तपासल्याच यातून दिसून येतय. टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.