हल्ला होताच पाकिस्तानी सैन्य जीव मुठीत घेऊन पळत सुटले, अशी फजिती जगात कोणत्याच देशाची झाली नसेल, पाहा Video

Pakistan-Afghanistan Tension : पाकिस्तान-अफगाणिस्तान संघर्ष चांगलाच पेटला असून तालिबान्यांनी पाकिस्तानी लष्करी चौकीवर हल्ला करून ताबा मिळवला, त्यात 58 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा करण्यात येत आहे. हल्ला झाल्यावर पाकिस्तानी सैन्याची दाणादाण उडाली, त्याचा एक व्हिडीओही समोर आला आहे. सीमेवरील परिस्थिती अतिशय तणावपूर्ण आहे.

हल्ला होताच पाकिस्तानी सैन्य जीव मुठीत घेऊन पळत सुटले, अशी फजिती जगात कोणत्याच देशाची झाली नसेल, पाहा Video
पाक-अफगाण तणाव
| Updated on: Oct 13, 2025 | 10:01 AM

Pak-Afg Conflict : अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवरील परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे. दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांच्या प्रदेशांवर सतत हल्ले करत आहेत. आधी पाकने अफगाणिस्तावर हल्ला केला, ज्यात अनेक सैनिक मारले गेले. मात्र त्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना तालिबान्यांनी देखील पाकवर हल्ला चढवला. हल्ल्यांचे हे सत्र कायम सुरू असून पाकचे 58 सैनिक ठार झाल्याचा दावा करण्यात येत आहे. याच दरम्यान, पाकिस्तानी सैन्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अफगाण तालिबानी सैनिकांनी पाकिस्तानी चौकीवर हल्ला केल्यानंतर असीम मुनीरच्या सैनिकांची दाणादाण उडाली, त्यांची पळापळ झाल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानातील तालिबानी दहशतवादी पाकिस्तानमध्ये घुसले आणि त्यांनी एका लष्करी चौकीवर हल्ला केला. या हल्ल्यात सुमारे 58 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचे वृत्त आहे. तर 5 पाकिस्तानी सैनिकांना जिवंत पकडण्यात आले. एका व्हिडिओमध्ये अफगाण सैनिक पाकिस्तानी चौक्या ताब्यात घेताना आणि पाकिस्तानी सैनिक जीव वाचवण्यासाठी पळून जाताना स्पष्टपणे दिसत आहे.

अफगाणिस्तानने 25 पाकिस्तानींना पकडले

या व्हिडिओमध्ये अफगाण सैनिक हे चौकीवरील पाकिस्तानी सैनिकांकडून शस्त्रे हिसकावून घेतानाही दिसत आहेत. अफगाणिस्तानमधील सरकारे असा दावा केला आहे की हल्ल्यात 58 पाकिस्तानी सैनिक मारले गेले तसेच त्यांनी नेक पाकिस्तानी सैनिकांना अटक केली, चौक्याही ताब्यात घेतल्या. मात्र, पाकिस्तान सरकार आणि लष्कराने हे दावे सपशेल फेटाळून लावले आहेत.

या हल्ल्यानंतर, अफगाणिस्तान सीमेवर सतत अधिक सैन्य पाठवत आहे. तालिबानी लढाऊ अमेरिकन शस्त्रे आणि वाहनांनी सुसज्ज आहेत. 2021 मध्ये जेव्हा अमेरिकेने अफगाणिस्तानातून आपले सैन्य मागे घेतले तेव्हा त्यांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि लष्करी वाहने मागे सोडली. आता ही सर्व आधुनिक शस्त्रे तालिबानकडे आहेत आणि ते या शस्त्रांचा वापर करून पाकिस्तानविरुद्ध कारवाई करत आहेत.

 

तणावाचे कारण तरी काय ?

खरं तर, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील संबंध आधीच ताणलेले आहेत. पाकिस्तानचा असा आरोप आहे की अफगाणिस्तान, विशेषतः त्यांचे सरकार, तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) सारख्या दहशतवादी संघटनांना आश्रय देते. मात्र अफगाणिस्तानकडून हे आरोप फेटाळून लावण्यात आले आहेत.

अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मुत्ताकी सध्या भारताच्या दौऱ्यावर आल्यामुळे पाकिस्तान संतापला होता. त्यानंतर पाकिस्तानने अफगाणिस्तानात हवाई हल्ले केले. मात्र, त्या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानने त्यांना प्त्युत्तर देत त्यांचे अनेक सैनिक ठार केले. आणि पाकिस्तानी सैन्याला डुरंड रेषेवरून (पाक-अफगाण सीमा) माघार घेण्यास भाग पाडलं.