
पाकिस्तान-अफगाणिस्तान या दोन्ही देशांमध्ये सध्या 48 तासांसाठी संघर्ष विराम झाला आहे. मागच्या आठवड्यात पाकिस्तानने काबूलवर एअर स्ट्राइक केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये लढाईला सुरुवात झाली. अफगाणिस्तानने त्यांच्या भूमीत एअर स्ट्राइक करणाऱ्या पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. अफगाणिस्तानच्या तालिबानी सैन्याने सीमावर्ती भागातील पाकिस्तानी चौक्यांवर मोठा हल्ला केला. यात पाकिस्तानचे 58 सैनिक मारले गेले. त्यांच्या अनेक सैनिकांना तालिबानने बंधक बनवलं. अफगाण तालिबानने पाकिस्तानी सैन्याला चांगलचं धुतलं. आता सवयीप्रमाणे पाकिस्तानने अफगाणिस्तानसोबत निर्माण झालेल्या तणावाच खापर भारतावर फोडलं आहे. अफगाणिस्तान भारताच प्रॉक्सी युद्ध लढत आहे, असा आरोप अफगाणिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केला आहे. भारत सरकारने अजून यावकर कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. सध्या दोन्ही देशांमध्ये 48 तासांसाठी संघर्ष विराम झाला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्णय काबूल ऐवजी दिल्लीतून होत आहेत, असा आरोप आसिफ यांनी केला आहे. अलीकडेच अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर आलेले, त्यावरही आसिफ यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी यांनी भारताच्या सहादिवसांच्या दौऱ्यावर जाऊन प्लान बनवला असा हास्यास्पद आरोप ख्वाजा आसिफ यांनी केला. आता अफगाणिस्तानचा पाकिस्तानबरोबर जसा सशस्त्र संघर्ष झाला, तसा मे महिन्यात भारत-पाकिस्तानमध्ये संघर्ष झालेला. जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर लॉन्च करुन पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला होता. भारताने पाकिस्तानची अशी हालत करुन टाकलेली की, त्यांना युद्ध विरामासाठी भारतीय सैन्याच्या DGMO कडे अक्षरश: याचना करावी लागलेली.
अफगाणिस्तान-पाकिस्तानमध्ये पहिलं झुकलं कोण?
अफगाणिस्तान-पाकिस्तान सशस्त्र संघर्षात दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर जिवीतहानी झाली. त्यानंतर 48 तासांसाठी संघर्ष विराम जाहीर करण्यात आला आहे. हा अस्थायी संघर्ष विराम आहे. अफगाणिस्तानच्या विनंतीवरुन हा संघर्ष विराम केल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. अफगाणिस्तानने मात्र पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्ध विराम लागू केल्याचं म्हटलं आहे. अफगाणिस्तान सरकारचे मुख्य प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी सांगितलं की, पाकिस्तानच्या विनंतीवरुन दोन्ही देशांमध्ये संघर्षविराम झाला आहे.