PAK Air Force : पाकिस्तान एअर फोर्सला धक्का, इतका भयानक विमान अपघात तुम्ही बघितला नसेल एका क्षणात..VIDEO
PAK Air Force : पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख आसिम मुनीर आणि सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. मृत पायलटच्या कुटुंबियांबद्दल शोक संवेदना व्यक्त केल्या. पाच दिवसापूर्वी पाकिस्तानी सैन्याचं एक हेलिकॉप्टर कोसळलं होतं.

पाकिस्तानी एअर फोर्सला आज मोठा धक्का बसला. एक ट्रेनी विमान खैबर पख्तूनख्वाच्या मरदान भागात कोसळलं. या दुर्घटनेत दोन वैमानिकांचा मृत्यू झाला. खूप भयानक पद्धतीने हा विमान अपघात झाला. रस्त्यावर वर्दळ सुरु असताना अचानक हे विमान कोसळलं. यात रस्त्यावरील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर बचाव पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचलं व मदतकार्य सुरु केलं. पाकिस्तानी एअर फोर्सने विमान अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. जेणेकरुन अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट होईल. या विमान अपघाताचं CCTV फुटेज समोर आलय.
प्राथमिक माहितीनुसार, ट्रेनी विमानाने नियमित ट्रेनिंगसाठी उड्डाण केलं होतं. उड्डाणा दरम्यान काही तांत्रिक बिघाड झाल्याने विमान थेट जमिनीवर येऊन कोसळलं. विमान कोसळताच मोठा आवाज झाला आणि विमानाने पेट घेतला. दुर्घटनेनंतर घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात काळ्या धुराचे लोट उठत होते, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. विमानाचे तुकडे विखरुन पडले होते. वैमानिकांचे मृतदेह रस्त्यावर पडले होते. गृहमंत्री मोहसीन नकवी यांनी दृघटनेची पुष्टि केली आहे. कॅप्टन कासिम आणि कॅप्टन तलहा अशी मृत्यूमुखी पडलेल्या दोन वैमानिकांची नावं आहेत.
A Pakistan Air Force PAC MFI-395 Super Mushshak crashed near Mardan, Khyber Pakhtunkhwa, during a training sortie this morning after developing a technical fault.
The aircraft was being flown by two trainee cadets from PAF Academy Asghar Khan. Both pilots lost their lives in the… pic.twitter.com/EOfoxoXKlP
— Ababeel (@AbabeelMilitary) June 15, 2026
पाच दिवसापूर्वीच घडलेली मोठी घटना
पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख आसिम मुनीर आणि सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. मृत पायलटच्या कुटुंबियांबद्दल शोक संवेदना व्यक्त केल्या. पाच दिवसापूर्वी पाकिस्तानी सैन्याचं एक हेलिकॉप्टर कोसळलं होतं. मुजफ्फराबाद जवळ टेक्निकल कारणांमुळे सैन्याचं MI-17 हेलिकॉप्टर कोसळलं. त्या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमधील सर्वांचा मृत्यू झाला. याआधी 20 मे रोजी पाकिस्तानच्या पूर्व पंजाब प्रांतात फायटर विमान कोसळलं होतं. ते होंगडू जेएल-8 ट्रेनिंग विमान होतं. मियांवली जवळ हे विमान कोसळलं होतं. दोन्ही वैमानिकांनी वेळेत इजेक्ट केल्यामुळे ते वाचले.