AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistan : कल्पना केली नव्हती ते घडलं, भारताने डायरेक्ट 12 अणवस्त्र तैनात करताच पाकिस्तानातून आली पहिली प्रतिक्रिया

Pakistan : भारताने आपलं अणवस्त्र धोरण बदलल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. भारताने थेट 12 अणवस्त्र तैनात केली आहेत. हा पाकिस्तानच नाही, जगासाठी सूचक संदेश आहे. सहाजिकच ही बातमी समोर आल्यानंतर पाकिस्तानचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Pakistan : कल्पना केली नव्हती ते घडलं, भारताने डायरेक्ट 12 अणवस्त्र तैनात करताच पाकिस्तानातून आली पहिली प्रतिक्रिया
Astr Missile
| Updated on: Jun 12, 2026 | 2:27 PM
Share

स्टॉकहोम इंटरनेशनल पीस रिसर्च इंस्टीट्यूटच्या ताज्या रिपोर्टमुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. जागतिक शस्त्रास्त्रांवर खासकरुन अणवस्त्रांवर लक्ष ठेवणारी ही संस्था आहे. दक्षिण आशियातील रणनितीक संतुलन आणि सैन्य शक्तीच्या दृष्टीकोनातून अनेकांना हैराण करणारी ही बातमी आहे. रिपोर्टनुसार भारताने इतिहासात पहिल्यांदाच अणवस्त्र स्टॉकपाइल मध्ये ठेवण्याऐवजी थेट ऑपरेशनल मोडमध्ये तैनात केले आहेत. ही बातमी समोर आल्यानंतर पाकिस्तान सरकार आणि तिथल्या परराष्ट्र मंत्रालयाचे धाबे दणाणले आहेत. त्यांच्या स्टेटमेंटमधून ते घाबरल्याचे संकेत मिळत आहेत. भारताची अणवस्त्र क्षमता, शक्ती आंतरराष्ट्रीय अंदाजांपेक्षा भरपूर जास्त आणि घातक असू शकते हे पाकिस्तानने जाहीरपणे मान्य केलं आहे.

भारताची वेगाने वाढणारी रणनितीक क्षमता आणि बदलत्या अणवस्त्र भूमिकेवर आमचं बारीक लक्ष आहे, असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी मान्य केलं. पाकिस्तानने खास करुन भारताच्या मिसाइल प्रणाली कॅनिस्टरायजेशन बद्दल जास्त चिंता व्यक्त केली आहे. कॅनिस्टरायजेशन एक अत्याधुनिक टेक्नोलॉजी आहे. ज्यात अणवस्त्राला आधीपासूनच मिसाइलच्या आता सील करुन ठेवलं जातं. युद्ध प्रसंगात भरपूर कमी वेळात मिसाइल वेगाने डागता येतं.

भारताकडे किती अणवस्त्र?

भारताच्या अणवस्त्र वाहून नेणाऱ्या पाणबुड्यांचा विस्तार आणि लांब पल्ल्याच्या इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल (ICBM) प्रणालीचा विकास याला पाकिस्तान आपल्या सुरक्षेसाठी सर्वात मोठा धोका मानतो. रिपोर्टनुसार, भारताकडे वर्तमानात 190 अणवस्त्र आहेत. यात महत्वाची बाब म्हणजे या 190 वॉरहेड्सपैकी 12 ऑपरेशनल दृष्टया तैनात आहेत. पहिल्यांदा कुठल्या जागतिक सुरक्षा एजन्सीने भारताच्या अणवस्त्रांकडे केवळ एक भंडार म्हणून न पाहता सक्रीय तैनाती म्हणून नोंद केली आहे.

पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय समुदायाकडे काय मागणी केली?

जमीन, समुद्र आणि हवेतून अणवस्त्र हल्ला करण्याची ताकद विकसित केली आहे. यामुळे भारताची क्षमता अजून परिपक्व आणि सुरक्षित झाली आहे. कुठल्याही संकट काळात भारताचा ‘ऑपरेशनल रेडीनेस’ युद्ध तयारी अनेक पटीने वाढली आहे असं पाकिस्तानच मत आहे. भारताच्या वाढत्या सैन्य आणि अणवस्त्र शक्तीमुळे घाबरलेल्या पाकिस्तानने आता जगातील श्रीमंत आणि शक्तीशाली देशांकडे विनवणी सुरु केली आहे. भारताला अत्याधुनिक सुरक्षा टेक्नोलॉजी आणि आधुनिक शस्त्रांचा पुरवठा थांबवा अशी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मागणी केली आहे.

Follow Us
‘मार्किंग पॅटर्न लीक झाला तर परीक्षा का घेतली?’ रोहित पवारांचा MPSC ला
मार्किंग पॅटर्न लीक झाला तर परीक्षा का घेतली? MPSC प्रकरणात नवा ट्विस्ट
MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षा कधी?
MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षा कधी?
अभिजीत दीपकेचा मोठा निर्णय; काल व्हिडीओ शेअर केला अन् आज...
अभिजीत दीपकेचा मोठा निर्णय; काल व्हिडिओ शेअर केला अन् आज...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका