AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saurav Das : सौरव दासवर लाखो पोरी फिदा, बनला नॅशनल क्रश; सोशल मीडियावर प्रपोजचं तुफान; पाहा काय घडतंय?

सीजेपीचे आंदोलन तर एक बहाणा होता, मी तर सौरव दासला पाहायला गेले होते, असं काही मुलींनी सोशल मीडियावर म्हटलंय. एका नेटकरी मुलीने तर सौरव दासला थेट नॅशनल क्रश म्हणून जाहीर करावं, अशी मागणीच केलीय.

Saurav Das : सौरव दासवर लाखो पोरी फिदा, बनला नॅशनल क्रश; सोशल मीडियावर प्रपोजचं तुफान; पाहा काय घडतंय?
cjp saurav dasImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 27, 2026 | 4:22 PM
Share

CJP Saurav Das : सध्या देशभरात सीजेपीचा बोलबाला आहे. सीजेपीने दिल्लीत मोठे आंदोलन उभारल्याने धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. गेल्या 12 वर्षांमध्ये पहिल्यांदाच मोदी यांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याला पायउतार व्हावे लागले आहे. सीजेपीचे आंदोलन उभे राहिले तेव्हा अनेक तरुण चेहऱ्यांनी या आंदोलनाचा रथ मोठ्या नेटान ओढला. यामध्ये सौरव दास यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. संपूर्ण आंदोलनात त्याने सीजेपीच भूमिका माध्यमांपर्यंत पोहोचवली. तसेच तरुणाईला सतत मार्गदर्शन करत आंदोलनाची वात पेटती ठेवली. आता सीजेपीचे आंदोलन संपले आहे. परंतु या आंदोलनात सीजेपीचा प्रमुख प्रवक्ता असलेल्या सौरव दासची सोशल मीडियावर चांगलीच हवा पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर त्याचीच चर्चा असून त्याला मुली नॅशनल क्रश म्हणायला लागल्या आहेत.

सोशल मीडियावर नेमकं काय घडतंय?

सोशल मीडियावर सध्या सीजेपीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांचीच चर्चा आहे. सौरव दासच्या लुकची, त्याच्या देखणेपणाचीही सगळीकडे वाहवा होत आहे. विशेष म्हणजे त्याच्या इन्स्टाग्राम सोशल मीडिया खात्यावर लाखो मुलींनी फॉलो केले आहे. काही मुलींनी तर आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर सौरव दासचे फोटो, रिल्स अपलोड करून त्याच्याविषयी प्रेम व्यक्त केलंय.

सीजेपीचे आंदोलन तर एक बहाणा होता, मी तर सौरव दासला पाहायला गेले होते, असं काही मुलींनी सोशल मीडियावर म्हटलंय. एका नेटकरी मुलीने तर सौरव दासला थेट नॅशनल क्रश म्हणून जाहीर करावं, अशी मागणीच केलीय. सौरव दासच्या देखणेपणावर लाखो मुली फिदा असल्याचं म्हटलं जातंय.

लोकांनी माझ्या कामाकडे पाहावे

दरम्यान, एका मुलाखतीत सौरव दासला याबाबत विचारण्यात आलं होतं. अनेक मुली तुला फॉलो करत आहेत, तुझं मत काय? असं विचारल्यानंतर मला लोक सोशल मीडियावर फॉलो करत असतील तर ते चांगलं आहे. पण माझ्या कामाकडेही लोकांनी पाहावे, असे आवाहन त्याने केले होते. दरम्यान, सौरव दासची सोशल मीडियावरील क्रेझ आणखी कायम आहे, भविष्यात त्याचे फॉलोअर्स आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Follow Us
राष्ट्रीय चित्रपट सोहळा गुजरातमध्ये, यामागे... आर्थिक उलाढाल झाल्याचा
राष्ट्रीय चित्रपट सोहळा गुजरातमध्ये, यामागे... आर्थिक उलाढाल झाल्याचा खळबळजनक दावा
अंजली दमानियांनी शेअर केला व्हिडीओ; पार्थ पवारांसह सरकारला घेरलं, एक..
अंजली दमानियांनी शेअर केला व्हिडीओ; पार्थ पवारांसह सरकारला घेरलं, एकच प्रश्न...
पुन्हा नाशिकमध्ये भोंदूबाबाकडून लोकांची फसवणूक, असलं आमिष दाखवलं की...
पुन्हा नाशिकमध्ये भोंदूबाबाकडून लोकांची फसवणूक, असलं विचित्र आमिष दाखवलं की पीडित...
लंडनमध्ये एकनाथ शिंदेंना मोठा सन्मान, मराठी संस्कृतीचा केला गौरव
लंडनमध्ये एकनाथ शिंदेंना मोठा सन्मान, मराठी संस्कृतीचा केला गौरव
अरे हे काय घडलं? शिंदे गटाला मोठा धक्का... पक्षातील अनुभवी नेत्याचं...
अरे हे काय घडलं? शिंदे गटाला मोठा धक्का... पक्षातील अनुभवी नेत्याचं पद धोक्यात
‘मार्किंग पॅटर्न लीक झाला तर परीक्षा का घेतली?’ रोहित पवारांचा MPSC ला
मार्किंग पॅटर्न लीक झाला तर परीक्षा का घेतली? MPSC प्रकरणात नवा ट्विस्ट
MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षा कधी?
MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षा कधी?
अभिजीत दीपकेचा मोठा निर्णय; काल व्हिडीओ शेअर केला अन् आज...
अभिजीत दीपकेचा मोठा निर्णय; काल व्हिडिओ शेअर केला अन् आज...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...