भारत ज्याला मित्र समजत होता तोच निघाला खरा विश्वासघाती, थेट पाकिस्तानसोबत मिळून..

भारताचे शेजारी देश मोठा कट शिजवताना दिसत आहेत. बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात मोठा संरक्षण करार होत आहे. बांगलादेश पाकिस्तानचा हात पकडताना दिसत आहे. नुकताच पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या बैठकीबद्दल धक्कादायक माहिती पुढे येत आहे.

भारत ज्याला मित्र समजत होता तोच निघाला खरा विश्वासघाती, थेट पाकिस्तानसोबत मिळून..
Military Air Training
| Updated on: May 12, 2026 | 8:45 AM

इराण आणि अमेरिका यांच्या युद्धात भारताने बांगलादेशला मदत केली. बांगलादेशला एलपीजी गॅस मदत म्हणून भारताने दिला. मात्र, काही दिवसातच बांगलादेशला भारताच्या मदतीचा विसर पडला. बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात मोठा संरक्षण करार होत आहे. पाकिस्तानच्या वायुसेनेचे उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळ बांगलादेशची राजधानी ढाका येथे पोहोचले. यादरम्यान दोन्ही देशांमध्ये वायुसेना पायलट प्रशिक्षण करारावर सह्या केल्या जातील. यासोबतच संरक्षणासंदर्भातील अजून काही मुद्द्यांमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश करार करणार आहेत. न्यूज 18 ने आपल्या एका रिपोर्टमध्ये स्पष्ट केले की, पाकिस्तान वायुसेना त्यांच्या सात सदस्यांसोबत बांगलादेश वायुसेनेच्या सोबत पहिल्यांदाच एअर स्टाफ टॉक्स आयोजित करेल. यादरम्यान हवाई सहाय्यता, प्रशिक्षण सराव आणि दोन्ही देशांमधील एअरफोर्समधील संबंध मजबूत केले जातील. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील मैत्री चांगलीच वाढताना दिसत आहे.

भारतासाठी ही अत्यंत मोठी धोक्याची घंटा आहे. पाकिस्तान कधीच आपल्या फायद्याशिवाय कोणत्याही गोष्टी करत नाही. पाकिस्तान भारताविरोधात मुद्द्याम बांगलादेशला जवळ करण्याचा प्रयत्न करत आहे. यादरम्यान JF-17 थंडर फायटर जेट्स यावरही चर्चा होऊ शकते. बांगलादेशचे एअर चीफ मार्शल हसन महमूद खान यांनी काही दिवसांपूर्वीच ही विमाने खरेदी करण्याची इच्छाही बोलून दाखवली होती.

JF-17 थंडर फायटर जेट्स पाकिस्तान आणि चीन यांनी मिळून तयार केली आहेत. आता तीच विमाने खरेदी करण्याच्या तयारीत बांगलादेश आहे. 1971 चे युद्ध विसरून बांगलादेश पाकिस्तानसोबत मैत्रीसाठी हात पुढे करत आहे. बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील प्रत्येक बैठकीवर भारताने बारीक लक्ष आहे. कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते, यामुळे भारत सर्तक आहे. सध्याच्या घडीला भारत बांगलादेशावरही विश्वास ठेऊ शकत नाही.

थेट पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात संरक्षण करार होत आहेत. बांगलादेशासोबत गेल्या काही दिवसांपासून भारताचे ठीक संबंध आहेत. मध्यल्या काळात हे संबंध तणावात होते. मात्र, त्यानंतर बांगलादेशात निवडणुका झाल्या आणि स्थिती बदलली. मात्र, पाकिस्तानचा हात बांगलादेशाने पकडल्याचे बघायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच बांगलादेशातील भारतीय दूतावासावर मोठा हल्ला करण्यात आला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us