
पाकिस्तानचा जिहादी विचारांचा लष्करप्रमुख असीम मुनीर चीन दौऱ्यावर आहे. इथे तो चीन-पाकिस्तान मैत्रीचे दाखले देत आहे. चीन आणि पाकिस्तान परस्परांचे विश्वासू सहकारी असल्याच म्हटलं जातं. पाकिस्तानी मीडियामध्ये सुद्धा या मैत्रीची खूप चर्चा असते. पण वास्तव काहीतरी वेगळं आहे. चीनमध्ये गेलेल्या मुनीरचे फोटो नीट बघितले तर लक्षात येईल की, पाकिस्तानी आर्मी चीफची तिथे इज्जत निघाली आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेतल्यानंतर उप राष्ट्रपती हान झेंग यांची भेट घेण्याआधी मुनीरची टोपी उतरवण्यात आली. त्याशिवाय पाकिस्तानात चिनी नागरिकांवर होत असलेल्या हल्ल्यांवरुन मुनीरला भरपूर काही सुनावण्यात आलं.
पाकिस्तानचे आर्मी चीफ आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्या भेटीदरम्यान वांग यी यांनी पाकिस्तानातील चिनी नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्द उपस्थित केला. CPEC कॉरिडोर आणि चिनी नागरिकांच्या सुरक्षेत कमी पडल्याबद्दल पाकिस्तानी आर्मी चीफला भरपूर सुनावण्यात आलं. पाकिस्तान त्यांच्या देशात राहणाऱ्या चिनी नागरिकांच्या सुरक्षेप्रती गंभीर आहे, हे मुनीरने पटवून देण्याचा प्रयत्न केला.
टोपी गायब कशी झाली?
जनरल मुनीरने जेव्हा परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेतली, तेव्हा त्याच्या डोक्यावर टोपी होती. पण जेव्हा तो उप राष्ट्रपती हान झेंग यांना भेटायला पोहोचला, त्यावेळी मुनीरच्या डोक्यावर टोपी नव्हती. सांगितलं जातय की, चीनने मुनीरची टोपी उतरवली. या भेटीआधी मुनीर जेव्हा गार्ड ऑफ ऑनर स्वीकारण्यासाठी पोहोचला, त्यावेळी त्याच्या डोक्यावर कॅप दिसतेय उप राष्ट्रपती हान सोबत फोटो काढण्याआधी टोपी गायब होती.
ISPR कडून खोटा प्रचार
मुनीरच्या चीन दौऱ्याची पाकिस्तानी मीडियामध्ये भरपूर चर्चा आहे. ISPR ने रिलीज केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलय की, चीनकडून पाकिस्तानी सैन्याच भरपूर कौतुक करण्यात आलं. बीजिंगमध्ये चिनी राजनैतिक अधिकारी आणि सैन्यासोबत पाक आर्मी चीफच्या बैठका झाल्या. CPEC कॉरिडोर आणि भू राजकीय आव्हान हा या बैठकीत चर्चेचा विषय होता. दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय संबंधांबद्दल समाधान व्यक्त केलं. दीर्घकाळ सहकार्याची कटिबद्धता व्यक्त केली.