इराणवर इतके प्रेम आहे तर जा तिथे… शिया समुदायाला थेट धमकी, पाकिस्तानात..

इराण आणि अमेरिका युद्ध टोकाला पोहोचले आहे. दुसरीकडे या युद्धाचा फटका अनेक देशांना बसत आहे. यादरम्यानच पाकिस्तानमध्ये मोठा हाहाकार आहे. पाकिस्तानातील शिया समुदायात संतापाचे वातावरण आहे.

इराणवर इतके प्रेम आहे तर जा तिथे... शिया समुदायाला थेट धमकी, पाकिस्तानात..
Pakistan Army Chief Field Marshal Asim Munir
| Updated on: Mar 21, 2026 | 9:57 AM

इराण आणि अमेरिका युद्ध टोकाला पोहोचले आहे. पूर्ण जग या युद्धामुळे संकटात आहे. युद्ध फक्त अमेरिका, इस्त्रायल आणि इराणपुरते आता मर्यादित राहिले नाही. या युद्धाचा सर्वांनाच मोठा फटका बसत आहे. होर्मुज खाडी इराणकडून बंद करण्यात आली जगातील जहाज तिथे अडकून पडली आहेत. तेलाची निर्यात आणि आयात जवळपास बंद झाली. यासोबतच तेल रिफायनरी आणि गॅस प्रकल्पांवरही मोठी हल्ले केली जात आहेत. इराण आणि अमेरिका युद्धाचा परिणाम भारत आणि पाकिस्तानमध्येही बघायला मिळाला. अनेक लोक रस्त्यावर उतरून अमेरिकेचा निषेध करताना दिसले. पाकिस्तानमध्ये लोक अधिक आक्रमक झाले आणि थेट अमेरिकन दूतावास कार्यालयाला टार्गेट करत जाळपोळ केली. हेच नाही तर पाकिस्तानमध्ये झालेल्या उद्रेकानंतर अनेक ठिकाणी अमेरिकेकडून व्हिसा सर्व्हिस बंद करण्यात आली. यादरम्यानच आता मोठी खळबळ उडालीये.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर यांची देशातील प्रमुख शिया धर्मगुरूंशी थेट भेट झाली. सूत्रांनुसार, लष्करप्रमुखांनी धर्मगुरूंना प्रतिसाद देण्याची किंवा त्यांची मते व्यक्त करण्याची संधी न देता जवळपास एक तास सतत भाषण केले. यावेळी शिया धर्मगुरूंना अजिबात बोलू दिले नाही किंवा अजिबात त्यांना त्यांचे मत मांडण्याची संधी देण्यात आली नाही.

यावेळी वातावरण तणावपूर्ण होते. या वादाचे प्रमुख कारण म्हणजे लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी एक विधान केले होते, ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, जर तुमचे इराणवर इतके जास्त प्रेम आहे तर तिथे जा.. यानंतर शिया समुदायामध्ये रोष होता. शिया समुदायाने हे वक्तव्य त्यांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह म्हणून पाहिले. अनेक धर्मगुरूंनी याला अपमानकारक थेटपणे म्हटले.

मौलाना हसनेन अब्बास गर्देझी म्हणाले की, अशी भाषा घटनात्मक पद भूषवणाऱ्या अधिकाऱ्याला शोभणारी नाही. आम्ही या बैठकीत अनेकदा संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण आम्हाला बोलण्याची संधी देण्यात आली नाही. रात्रीच्या जेवणानंतर दुसऱ्या बैठकीचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु लष्करप्रमुख अचानक निघून गेले. पाकिस्तानी शिया लोकांमध्ये मोठा संताप बघायला मिळत आहे.

Follow Us