AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोनाल्डोच्या पहिल्या मुलाची आई कोण? बॉलिवूड अभिनेत्रीसोबतच्या अफेअरने चर्चांना उधाण

Who is Cristiano Ronaldo jr Parents: क्रिस्टियानो रोनाल्डो २०१६ मध्ये जॉर्जियाना रॉड्रिग्जला भेटला, गेल्या वर्षी त्यांचा साखरपुडा झाला आणि आता ते विवाह बंधनात अडकले. रोनाल्डो वयाच्या २५ व्या वर्षी पहिल्यांदाच वडील झाला होता. पण त्याच्या मुलाची आई कोण आहे? याबाबत आजही चर्चा सुरु आहेत.

रोनाल्डोच्या पहिल्या मुलाची आई कोण? बॉलिवूड अभिनेत्रीसोबतच्या अफेअरने चर्चांना उधाण
Cristiano Ronaldo JrImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 12, 2026 | 11:12 AM
Share

पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो २०१६ मध्ये जॉर्जिना रॉड्रिगेजला पहिल्यांदा भेटले होता. जॉर्जिया तेव्हा गुच्चीच्या स्टोअरमध्ये काम करत होती. जॉर्जिनाने एका मुलाखतीत सांगितले होते की रोनाल्डोला पाहताच ती त्याच्या प्रेमात पडली होती. दोघे दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये होते. गेल्या वर्षी त्यांनी साखरपुडा केला आणि आता लग्नही केले आहे. रोनाल्डो हा जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक आहे. तो मैदानातील खेळीमुळे नेहमीच चर्चेत असतो, पण त्याचे वैयक्तिक जीवनही कायम चर्चेचा विषय बनला.

क्रिस्टियानो ज्युनियरची आई कोण आहे?

क्रिस्टियानो ज्युनियर हे रोनाल्डोच्या सर्वात मोठ्या मुलाचे नाव आहे. त्याचा जन्म तेव्हा झाला होता जेव्हा रोनाल्डो २५ वर्षांचा होता. क्रिस्टियानो ज्युनियरही आपल्या वडिलांसारखाच फुटबॉलपटू बनू इच्छितो. तो आता ज्युनियर क्लब टीमसाठी खेळायला सुरुवात करत आहे. रोनाल्डोने अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की त्याचा मोठा मुलगाही त्याच्यासारखाच कठोर डायट फॉलो करतो.

रोनाल्डोने कधीही हे उघड केले नाही की त्याच्या पहिल्या मुलाची आई कोण आहे. मात्र याबाबत वेगवेगळ्या चर्चा आहेत. क्रिस्टियानो ज्युनिअरची आई एकेकाळी डान्सर होती असे म्हटले जाते. रोनाल्डोने आपल्या मुलाला वाढवण्यासाठी त्या महिलेला खूप पैसे आणि राहण्यासाठी मोठे घर दिले असल्याच्या चर्चा आहेत.

रोनाल्डोचे बॉलिवूड अभिनेत्रीसोबत अफेअर

ही २००७ सालची गोष्ट आहे. पोर्तुगालच्या लिस्बनमध्ये एक समारंभ होता. यादरम्यान एका पार्टीत क्रिस्टियानो रोनाल्डो आणि बिपाशा बसू एकत्र होते. दोघांचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये दोघे खूप जवळ उभे होते आणि कथितरीत्या किस करत होते. त्यानंतर दोघांच्या अफेअर आणि रोमान्सच्या बातम्या येऊ लागल्या. मात्र त्यानंतर दोघे कधीही एकत्र दिसले नाहीत. त्यामुळे ही फक्त एक अफवा असल्याचे वाटू लागले.

रोनाल्डोच्या नवजात मुलाचा मृत्यू झाला होता

जॉर्जिना आणि क्रिस्टियानो रोनाल्डोने २०२२ मध्ये जुळ्या मुलांचे आई-वडील होणार होते. पण डिलिव्हरीदरम्यान त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. मुलगी सुरक्षित जन्माला आली होती. हा रोनाल्डोच्या आयुष्यातील दुःखद काळ होता, ज्याची माहिती त्यांने स्वतः दिली होती.

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी