Fatah 1 Missile : फेकूगिरीत पाकिस्तानला तोड नाही, भारतात त्यांनी फतह-1 मिसाइल्स अशा ठिकाणी मारली की जी..

Fatah 1 Missile : पाकिस्तान खोटी कामं करण्याच्या बाबतीत इतका पुढे आहे की त्यांच्या आसपास पण कुठला देश पोहोचू शकत नाही. महत्वाचं म्हणजे आपल्या या कारनाम्यांमध्ये त्यांनी देशातल्या मीडियाला देखील सहभागी करुन घेतलं आहे. आता पाकिस्तानने स्वत:हूनच सर्वांना खिल्ली उडवण्याचा विषय दिला आहे.

Fatah 1 Missile : फेकूगिरीत पाकिस्तानला तोड नाही, भारतात त्यांनी फतह-1 मिसाइल्स अशा ठिकाणी मारली की जी..
Missile
| Updated on: May 19, 2026 | 1:39 PM

भारत आणि पाकिस्तान यांच्यात मागच्यावर्षी चार दिवस सैन्य संघर्ष झाला. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांची हत्या केली म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने ऑपरेशन बुनयान अल-मरसूसची घोषणा केली होती. भारतीय सैन्य दलाने या काळात ब्राह्मोस मिसाइलने अचूक हल्ला करुन पाकिस्तानी एअरफोर्सच्या धावपट्ट्या उखडून टाकल्या. सगळ्या जगाने हे दृश्य पाहिलं. पण पाकिस्तान अजूनही जे केलं नाही, त्याचे ढोल बडवत आहे. पाकिस्तानी सैन्याचे अधिकारी आपल्या जनतेला कसे मूर्ख बनवतात, त्याचं एक ताजं उदहारण समोर आलं आहे. नुकताच पाकिस्तानच्या जियो न्यूज चॅनलने ऑपरेशन बुनयान अल-मरसूसच्यावेळी फतह-1 मिसाइल डागणाऱ्या लॉन्च टीमचा इंटरव्यू केला.

आमच्या फतह-1 मिसाइलने भारतातील दोन सैन्य तळांना यशस्वीरित्या टार्गेट केलं असा दावा या पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केला. पण या दाव्यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालय. कारण या पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी ज्या एअरबेसचा उल्लेख केला, ते मूळात भारतात अस्तित्वातच नाहीयत. फतह-1 मिसाइल लॉन्च टीमच्या सदस्यांची जियो न्यूज चॅनलने मुलाखत घेतली. अँकरने त्यांना थेट प्रश्न विचारला की, फतह-1 मिसाइलने आपलं टार्गेट उद्धवस्त केलं की नाही?. त्यावर कॅप्टन मुनीब जमाल यांनी निश्चितच असं उत्तर दिलं. आम्हाला दोन टार्गेट दिलेले. राजौरी एअरबेस आणि मामून एअरबेस. आम्ही दोन्ही टार्गेट्सवर यशस्वी हल्ला केला.

पाकिस्तान खोटं बोलतो त्याचा हा घ्या पुरावा

हा इंटरव्यू पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात पाहण्यात आला. मिसाइलने अचूकरित्या टार्गेटचा वेध घेतल्याच सांगण्यात आलं. पण सोशल मीडियावर ही बातमी येताच टार्गेट्सच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. भारतात राजौरी एअरबेस आणि मामून एअरबेस नावाचे इंडियन एअरफोर्सचे कुठले बेसच नाहीयत. त्यामुळे पाकिस्तानच्या या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होणं स्वाभाविक आहे. राजौरी जम्मू-काश्मीरमधला एक जिल्हा आहे. तिथे भारतीय सैन्याचे काही युनिट्स तैनात असतात. पण तिथे कुठलाही एअरफोर्सचा बेस नाहीय.

भारतात एअरबेस कुठे आहेत?

मामून पठानकोटमध्ये एक सैन्य कॅटोनमेंटचा भाग आहे. तिथे लष्कराच्या ब्रिगेड्स, युनिट्स असतात. पण तिथेही कुठला एअरबेस नाही. सोशल मिडिया आणि डिफेन्स एक्सपर्टस याला पाकिस्तानची फेकूगिरी म्हणत आहेत. भारतात पठानकोट, जम्मू, श्रीनगर, उधमपुर या ठिकाणी एअरबेस आहेत. पण पाकिस्तानी अधिकाऱ्यांना एकाही ठिकाणाचं योग्य नाव घेता आलेलं नाही. पाकिस्तानी मिडिया आणि सैन्याच्या विश्वसनीयतेवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

 

Follow Us