
बोलन ट्रेन हायजॅक प्रकरणात पाकिस्तानी सैन्याचा खोटारडेपणा उघड झालाय. बलोच लिबरेशन आर्मीने एक स्टेटमेंट जारी केलय. त्यात त्यांनी म्हटलय की, पाकिस्तानी सैन्य जनतेची दिशाभूल करत आहे. अजूनही त्यांचे 150 सैनिक आमच्या ताब्यात आहेत. पाकिस्तान आर्मी आपल्या सैनिकांच्या बाबतीत गंभीर नाहीय, असा BLA चा दावा आहे. ट्रेन हायजॅक झाल्याच्या घटनेनंतर 24 तासांनी मंगळवारी संध्याकाळी पाकिस्तानी सैन्याच्या अधिकाऱ्यांनी प्रेस कॉन्फ्रेंस घेतली व हायजॅक ऑपरेशन संपल्याला दावा केला. पाकिस्तानी सैन्याच्या दाव्यात का तथ्य नाहीय? ते किती असत्य आहे, ते या 5 पॉइंटमधून समजून घ्या.
1 ) बलोच लिबरेशनच्या फायटर्सनी सोमवारी जफर एक्सप्रेस हायजॅक केली. ट्रेनला बोलनच्या जवळ एका बोगद्यात रोखण्यात आलं. पाकिस्तानी सैन्याचा दावा आहे की, त्यांनी बलोच फायटर्सचा खात्मा केलाय. पण तिथून अजून ट्रेन वाहतूक का सुरु झालेली नाही? याच उत्तर पाकिस्तानी सैन्याने दिलेलं नाही.
पाकिस्तानी सैन्याने ऑपरेशन संपल्यानंतर ट्रेन वाहतूक सुरु झाल्याचा कुठलाही व्हिडिओ रिलीज केलेला नाही. उलट पाकिस्तान रेल्वेने बलुचिस्तान मार्गावर धावणाऱ्या सर्व ट्रेन्सची वाहतूक तीन दिवसांसाठी थांबवली आहे.
सामान्यत: अशा घटनेनंतर मीडिया किंवा सरकारकडून घटनास्थळावरच फुटेज जारी केलं जातं. पाकिस्तानी सैन्याने अजून तिथला कुठलाही व्हिडिओ जारी केलेला नाही. दुसऱ्याबाजूला बलोच फायटर्सनी हायजॅकचा व्हिडिओ रिलीज केलाय.
2) ऑपरेशन संपल्यानंतर पाकिस्तानी सैन्याकडून काही स्थानिक पत्रकारांना बोलन ऑपरेशनचे फोटो पाठवण्यात आले. ज्यात बीएलए फायटर्सचे मृतदेह होते. पाकिस्तानी पत्रकार अनस मलिक आणि मुजमल वहराईच यांनी ते फोटो सोशल मीडियावर शेअर केले. नंतर समजलं की, हे फोटो एप्रिल 2024 चे आहेत. फॅक्ट चेकनंतर पत्रकारांनी ते फोटो डिलीट केलं. पाकिस्तानी सैन्याचा दावा आहे की, त्यांनी 33 फायटर्सना मारलं. बीएलने फक्त दोघांचा मृत्यू झाल्याच कबूल केलं आहे.
3) पाकिस्तान आर्मीने क्वेटा येथे 200 शेवपेट्या आणल्या आहेत. सैन्याच्या अधिकाऱ्यांना या बद्दल विचारलं, तेव्हा त्यांनी योग्य उत्तर दिलं नाही. सैन्याचे अधिकारी हे सांगू शकले नाहीत की, 200 शेवपेट्या क्वेटाला का आणल्या? सरकारने म्हणणं ऐकलं नाही तर दर तासाला पाच सैनिकांना मारणार अशी धमकी BLA ने दिली आहे.
4) स्थानिक वर्तमानपत्र बलूचिस्तान पोस्टनुसार, रात्री उशिरापर्यंत ऑपरेशनच्या हालचाली सुरु होत्या. पाकिस्तानी सैनिकांनी सगळा भाग ताब्यात घेतला आहे. लोकांना घरातून बाहेर पडण्यावर बंदी आहे. पाकिस्तानी हेलिकॉप्टरच्या रात्रभर घिरट्या सुरु होत्या. वर्तमानपत्रानुसार या ऑपरेशनमध्ये 240 सैनिक आहेत. डोंगराळ भाग असल्याने अडचणी येत आहेत.
5) BLA ने ट्रेन हायजॅक केल्यानंतर पाकिस्तानी सैनिकांची डिटेल दिली. दुसरीकडे पाकिस्तानी सैन्याने ऑपरेशन संपल्यानंतर बीएलए बंडखोरांबद्दल कुठलीही माहिती दिलेली नाही तसेच त्यांच्याकडून काय शस्त्र जप्त केली ते सुद्धा सांगितलेलं नाही. ऑपरेशन संपल्यानंतर पोलीस आणि प्रशासनाकडून मीडियाला पूर्ण माहिती दिली जाते. पाकिस्तानी सैन्य या प्रकरणात नाचक्की होऊ नये, म्हणून खोटी माहिती देत असल्याची चर्चा आहे.