हुती बंडखोरांनी सौदीवर केले हल्ले, पाकिस्तानने दिला धोका, सौदीने आता इस्रायलकडे पसरले हात…
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडच्या मध्यस्थीने इस्रायल आणि सौदी अरेबिया यांच्यात गुप्त माहितीच्या देवाणघेवाणीवर चर्चा झाली आहे.विशेष म्हणजे इस्रायल आणि सौदी अरेबिया यांच्यात कोणतेही राजकीय संबंध नाहीत.

इराणचे पाठीराखे असलेल्या येमेनच्या हुतीच्या बंडखोरांनी १४ ते १५ सप्टेंबर २०२६ रोजी सौदी अरबच्या अनेक शहरांवर आणि सैन्य तळांवर बॅलेस्टिक मिसाईल आणि ड्रोनने मोठे हल्ले केले होते. सौदीला संकटात पाहून पाकिस्तानने मदतीला येण्या ऐवजी सौदीला वाऱ्यावर टाकले आहे. येमेनच्या लाल समुद्र किनारा आणि बाब अल-मंडेब स्ट्रेटमध्ये हुतीच्या ताब्यानंतर सौदी अरब आता मदतीसाठी इस्रायलच्या दारात पोहचला आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान प्रमाणे सौदीने देखील इस्रायलला स्वंतत्र देशाचा दर्जा दिलेला नाही. त्यामुळे दोन्ही देशात कोणतेही राजकीय संबंध नाहीत.
सौदीने इस्रायलकडे मागितली मदत
‘द जेरूसलम पोस्ट’ च्या बातमीनुसार इस्रायल आणि सौदी अरब यांनी अमेरिकन सेंट्रल कमांडच्या मध्यस्थेमध्ये चर्चा केली आहे. यात गुप्तचर सहायते द्वारे सौदी आणि हुती बंडखोरांच्या दरम्यान स्थिती सर्वसामान्य व्हावी यासाठी चर्चा झाली. इस्रायलच्या हयोम न्यूज पेपरने दिलेल्या वृत्तानुसार सौदी अरबचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी हुती बंडखोरांच्या विरोधात लढाईत अन्य आखाती देशांकडे आणि इजिप्तकडे मदतीची याचना केली होती. यात दावा केला जात आहे की मोहम्मद बिन सलमान यांनी युएस सेंट्रल कमानद्वारा अप्रत्यक्ष रुपाने इस्रायलशी संपर्क केला होता. ज्यात बाब अल-मंडेब स्ट्रेट (गेट ऑफ टियर्स) वर आलेल्या संकटा संदर्भात मदत मागितली होती.
सौदी अरब इस्रायलला एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिलेली नाही. आणि दोन्ही देशात राजकीय संबंध नाही. तरीही इस्रायल सोबत त्यांचा संपर्क भलेही अप्रत्यक्ष झाला असेल तरी हा येमेनमध्ये सौदीच्या समोरील गंभीर संकटाला दर्शवत आहे. तसेच अनेक देशांनी थेटपणे सौदीच्या अपिलाकडे दुलर्क्ष केले आहे. अमेरिका आणि ब्रिटनने येमेनमध्ये हुतींवर थेट हल्ल्यासंदर्भात नकार दिला आहे आणि त्याच्या ऐवजी गुप्तचर सहाय्यता आणि सैन्य सल्लागाराची मदत देऊ केली होती.
पाकिस्तानने सौदीला दिला धोका
पाकिस्तान, सौदी आणि तुर्कीए यांच्यात मक्का डिफेन्स अलायन्स झालेला आहे. पाकिस्तानने कथितपणे येमेनमध्ये हुतींशी लढण्यासाठी आपले सैन्य वा शस्रास्रे देण्यास नकार दिला आहे. इस्लामाबादने हे स्पष्ट केले आहे की त्यांचे सैन्य सौदी क्षेत्राच्या रक्षणासाठी तैनात केली जाऊ शकतात.