Breaking : पाकिस्तानच्या ग्वादर शहरात मोठा बॉम्ब स्फोट, चीनच्या 8 इंजिनिअर्सचा मृत्यू, तालिबान्यांवर संशय

| Updated on: Aug 20, 2021 | 9:54 PM

पाकिस्तानच्या बलुचीस्तान प्रांतातील ग्वादर या शहरात मोठा बॉम्ब स्फोट झाल्याची माहिती मिळतेय. या बॉम्ब स्फोटात चीनच्या 8 इंजिनिअर्सचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यामागे अफगाणिस्तानवर कब्जा केलेल्या तालिबान्यांच्या हात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. दरम्यान, आतापर्यंत कोणत्याही संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

Breaking : पाकिस्तानच्या ग्वादर शहरात मोठा बॉम्ब स्फोट, चीनच्या 8 इंजिनिअर्सचा मृत्यू, तालिबान्यांवर संशय
पाकिस्तानच्या ग्वादरमध्ये बॉम्ब स्फोट
Follow us on

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या बलुचीस्तान प्रांतातील ग्वादर या शहरात मोठा बॉम्ब स्फोट झाल्याची माहिती मिळतेय. या बॉम्ब स्फोटात चीनच्या 8 इंजिनिअर्सचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यामागे अफगाणिस्तानवर कब्जा केलेल्या तालिबान्यांच्या हात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. दरम्यान, आतापर्यंत कोणत्याही संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. दरम्यान, हा बॉम्ब स्फोट बलोच फायटर यांनी घडवून आणल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. (Bomb blast in Gwadar in Baluchistan, 8 Chinese engineers die in Blast)

पाकिस्तानात चीनी इंजिनिअर्सना लक्ष्य करत झालेला हा दुसरा मोठा बॉम्ब हल्ला आहे. यापूर्वी चीनी इंजिनिअर्सवर कोहिस्तान जिल्ह्याच्या दासु परिसरात मोठा हल्ला झाला होता. बसमधून ते लोक परतत असताना त्यांना लक्ष्य करण्यात आलं होतं. या हल्ल्यात एकूण 13 जणांचा मृत्यू झाला होता. त्यात चीनच्या 9 इंजिनिअर्सचा समावेश होता. या हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि चीनचे संबंधांमध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या. पाकिस्तानने बसमध्ये झालेल्या स्फोटाला तांत्रिक बिघाडाचं कारण देत झालेली दुर्घटना सांगितलं होतं. मात्र, त्यानंतर भारतावर आरोप करण्यात आला होता. यावरुन पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी घटनेच्या तपासाचे आदेश दिले होते. मात्र, चीनने इम्रान खान यांच्यावर विश्वास न ठेवता स्वत:ची टीम तपासासाठी पाठवली होती. इतकंच नाही तर चीनने पाकिस्तानला सुनावलं होतं की, आपल्या कर्मचाऱ्यांची सूरक्षा सुनिश्चित करायला हवी. मात्र, आज झालेल्या हल्ल्यानंतर हे स्पष्ट झालं आहे की पाकिस्तान त्यातही कमी पडलं आहे.

सिंध प्रांतातही हल्ला

अफगाणिस्तानात दहशत निर्माण करण्यासाठी पाकिस्तान सातत्याने तालिबान्यांची मदत घेत आला आहे. त्याचा परिणाम आता दिसून येत आहे. गुरुवारी सिंध प्रांतातील बहावन नगरमध्ये शिया समुदायाच्या एका मिरवणुकीवर हल्ला झाला होता. या हल्ल्यात 5 लोक मारले गेले. तर 40 लोक जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर परिसरात एकच पळापळ सुरु झाली आणि त्याचा फायदा घेत हल्लेखोर तिथून पसार झाले. या हल्ल्याचा संबंध अफगाणिस्तानातील तालिबान्यांशी जोडला जात आहे. अफगाण नागरिकांमध्ये पाकिस्तानबाबत प्रचंड राग आहे आणि मोठ्या संख्येनं लोक इथं शरणार्थी म्हणून येत आहेत.

इतर बातम्या :

गुरुद्वारा कमिटीसोबत बैठक, तालिबानचा अफगाणिस्तानातील हिंदूंबाबत मोठा निर्णय

अफगाणिस्तान ताब्यात घेतला पण तालिबानकडे विदेशी चलनाचा एक छदामही नाही, IMF चा कर्ज देण्यास नकार

Bomb blast in Gwadar in Baluchistan, 8 Chinese engineers die in Blast