AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistan Inflation: महागाईने होरपळणाऱ्या पाकिस्तानमध्ये पारलेजी बिस्कीट कितीला मिळतयं?

पाकिस्तानातील दुकानदाराने सांगितले की, जिवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठी वाढ झाली आहे. जे बिस्किट 5 रुपयांना विकायचे ते आता...

Pakistan Inflation: महागाईने होरपळणाऱ्या पाकिस्तानमध्ये पारलेजी बिस्कीट कितीला मिळतयं?
पाकिस्तानात महागाईचा भडकाImage Credit source: Social Media
| Updated on: Jan 10, 2023 | 4:21 PM
Share

मुंबई, पाकिस्तानमध्ये (Pakistan Inflation) अक्षरशः महागाईचा वनवा पेटला आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत खालावली आहे. महागाई या  स्थरावर गेली आहे की, भारतात 5 रुपयांना मिळणारे पार्लेजी बिस्कीट (Parle G) पाकिस्तानात (Pakistan News) 50 रुपयांना विकले जात आहे. आपल्या देशात 40-50 रुपयांना मिळणारी ब्रेड पाकिस्तानमध्ये 150-200 रुपयांना विकली जात आहे. मूठभर पीठासाठी लढाई सुरू आहे. शिवाय पिठाच्या गोण्यांच्या सुरक्षेसाठी एके-47 असलेले सैनिक तैनात आहेत. पिठ मिळावे यासाठी लोकं टाहो फोडत आहेत. दहशतवादाला खतपाणी घालनाऱ्या देशात आज महागाईमुळे हाहाकार माजला आहे. मात्र असे असतानाही दहशतवाद्यांची अकड मात्र कायम आहे. बिलावलसारखे त्यांचे नेते भारत आणि पंतप्रधान मोदींविरोधात अपमानास्पद भाषा वापरत असतात.

पाकिस्तानातील दुकानदाराने सांगीतली हकीकत

पाकिस्तानातील दुकानदाराने सांगितले की, जिवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठी वाढ झाली आहे. जे बिस्किट 5 रुपयांना विकायचे ते आता 50 रुपयांना विकले जात आहे. 450 रुपये किलोने पीठ विकले जात आहे. रिफाइंड तेल 850 प्रति लिटर झाले आहे. दरात 50 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. पाकिस्तानात जनता रस्त्यावर आली आहे. सरकारने आम्हाला मारले तर बरे, असे लोकं म्हणत आहेत. लोकं वाहनांच्या खाली जिव देण्याचा प्रयत्न करीत आहेत.सोशल मीडियावर येथील दुर्दशा पाहून तुम्हाला देखील धक्का बसेल.

महागाईचे व्हिडीओ होत आहेत व्हायरल

एका व्हिडिओमध्ये एक व्यक्ती गाडीखाली पडून आहे आणि म्हणत आहे की, जर तुम्हाला पीठ देता येत नसेल, तर कार आमच्या अंगावर चढवा, आम्हाला संपवा. आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये लोकं पिठासाठी भांडताना दिसत आहेत. हे भांडण, या दंगली पाकिस्तानात पिठासाठी होत आहेत, असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. आणखी एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे ज्यामध्ये शेकडो महिला ट्रकच्या मागे धावत आहेत. या ट्रकमध्ये पिठाची पोती भरलेली दिसत आहे. परकीय पैशावर पोसणाऱ्या पाकिस्तानने नेहमीच दहशतवादाचे समर्थन केले आहे. त्याचा त्यांनी भारतासाठी भरपूर उपयोग केला.

अमेरिकेने केली पुन्हा मदत

अमेरिकेने पाकिस्तानला पुन्हा मदत केली आहे. परकीयांच्या तुकड्यांवर वाढलेला हा देश आपल्याच कृत्याची शिक्षा भोगत आहे. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशात कंपन्या येत नाहीत. परदेशी गुंतवणूक नाही. वर्षभरापूर्वी आलेल्या पुराचे नुकसान अजूनही भरून निघालेले नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये लोकं आक्रोश करत आहेत. अनेक दिवस लोकांना पीठ मिळाले नाही. पिठाचे भाव गगनाला भिडले आहेत.

एका व्हिडिओमध्ये एक पोलिस हातात एके-47 घेऊन पिठाच्या गोण्यांचे रक्षण करत आहे. नुकतीच शरीफ मंत्रिमंडळाची बैठक झाली. यामध्ये आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आधी ऊर्जा संवर्धन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही बैठक मोकळ्या आकाशाखाली भर उन्हात झाली.

काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.