
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भारत दाैऱ्यावर होते. त्यांच्या या दाैऱ्याकडे जगाच्या नजरा होत्या. फ्रान्स आणि भारताची मैत्री अत्यंत जुनी आहे. आता या मैत्रीचा नवा अध्याय सुरू झाला. इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा एक फोटो पोस्ट केला. हा फोटो बरेच काही सांगून जाताना दिसतोय. फोटो शेअर करताना इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी थेट जय हो असे कॅप्शन दिले. मॅक्रॉन यांनी मुंबईत भारत-फ्रान्स इनोव्हेशन फोरमला संबोधित केले. मॅक्रॉन यांच्या या दाैऱ्याकडे जगाच्या नजरा लागल्या होत्या. मॅक्रॉन यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा खास फोटो शेअर केला. हा फोटो पाहून पाकिस्तानचा जळफळाट नक्कीच उठला असेल. भारत-फ्रान्स यांच्यातील धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत होणार आहे. मुळात म्हणजे भारत आणि फ्रान्स नेहमीच चांगले भागीदार राहिले आहेत.
इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले की, जागतिक चर्चा आता भारत करतो की नाही याबद्दल नाही तर भारतासोबत कोण नवोन्मेष करू इच्छिते याबद्दल आहे. फ्रान्स हा भारतासोबत ठामपणे उभा आहे आणि असेल असेही त्यांनी म्हटले. मॅक्रॉन पुढे म्हणाले, भारत फ्रेंच भागीदारी फक्त मोठ्या तांत्रिक प्रगतीपुरती मर्यादित नाही तर ती दैनंदिन जीवन निरोगी आणि सुरक्षित बनवण्यावर देखील लक्ष केंद्रित करते.
पंतप्रधान मोदींनी मॅक्रॉन यांचे भारतात स्वागत केले आणि थेट युरोपचे प्रमुख प्रवेशव्दार म्हणून फ्रान्सचा उल्लेख केला. PM मोदींनी 2026 हे वर्ष भारत-युरोप संबंधांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा आहे असे म्हटले. भारत आणि फ्रान्समधील संबंध आणखी दृढ झाल्याचे नरेंद्र मोदी यांनी यादरम्यान म्हटले. मॅक्रॉन यांनी यावेळी दोन्ही देशांमध्ये मोठे करार झाल्याची माहिती दिली.
अमेरिकेने भारतावर लाववेल्या टॅरिफनंतर भारताने अनेक देशांसोबत मुक्त व्यापार करार केली. युरोपियन युनियनसोबत भारताने मोठे करार केले. त्यामध्येच आता फ्रान्ससोबत भारताने मोठी भागीदारी केली. भारत आणि फ्रान्समधील मैत्री पाहून अनेकांनी धसका घेतल्याचेही स्पष्ट आहे.