भारत पाकिस्तान सीमेवर मोठ्या हालचाली, घडामोडींना प्रचंड वेग, थेट पाकिस्तानने ड्रोन..

गेल्या काही वर्षांपासून भारत पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावात आहेत. त्यामध्येच पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानने सळो की पळो करून सोडले. पाकिस्तानात घुसून थेट दहशतवाद्यांची अड्डे उद्धवस्थ केली. मोठा झटका दिला. आता भारत पाकिस्तान सीमेवर हालचाली वाढल्या आहेत.

भारत पाकिस्तान सीमेवर मोठ्या हालचाली, घडामोडींना प्रचंड वेग, थेट पाकिस्तानने ड्रोन..
India-Pakistan border
| Updated on: Dec 26, 2025 | 5:02 PM

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवले. या माध्यमातून पाकिस्तानमध्ये असलेले दहशतवादी अड्डे भारताच्या लष्कराने उद्धवस्थ केली. भारतीय लष्कराला प्रतिउत्तरही देण्यातही पाकिस्तान सक्षम दिसला नाही. भारताने पाकिस्तानच्या हातावर तुरी देत थेट मोठे हवाई हल्ले केले. विशेष म्हणजे भारताने थेट पाकिस्तानात घुसून हे हल्ले केले. पाकिस्तानी लष्कर कोणत्याही पद्धतीने भारताला रोखू शकले नाही. यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची स्थिती बघायला मिळाली. पाकिस्तानने ड्रोन हल्ला भारतावर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाकिस्तानी ड्रोन भारताच्या क्षेपणाशास्त्रांनी हवेतच उडवून टाकली.

भारताने पाकिस्तानचा बुरखा फाडला. युद्धाच्या मैदानात भारताविरोधात पाकिस्तान कधीच जिंकू शकत नाही, हे देखील भारताने पुन्हा एका सिद्ध करून दाखवले. पाकिस्तानने भारताने केलेल्या हल्ल्याची इतकी जास्त धसकी घेतली की, पाकिस्तानने एलओसीवरील एंटी ड्रोन सिस्टम वाढवली आहे. जर भारताने पुन्हा हवाई हल्ला केला तर त्यांना वेळ मिळेल. ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानकडे असलेले चीनी ड्रोन सिस्टम काहीच काम करू शकली नाही.

भारताला वाटेल तिथे भारताने हल्ले केले. पाकिस्तानने एलओसी जवळ पीओकेमध्ये एंटी ड्रोन तैनात केले असून त्याची संख्या वाढवली आहे. कोटली, रावलकोट, भीमबर सेक्टर येथे नवीन काऊंटर अनमॅन्ड एरियल सिस्टम लावले आहेत. नुकताच आलेल्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला की, पाकिस्तानने 30 डेडीकेटेड एंटी ड्रोन सिस्टम्स लावले आहेत.या माध्यमातून पाकिस्तान एअरस्पेस अजून चांगले करेल.

पाकिस्तानी सैन्याने काइनेटिक काऊंटर यूएएस सिस्टम मिक्स लावले आहे. असा दावा केला जात आहे की, दहा किलोमीटरपर्यंतच्या रेंजमधील छोट्या आणि मोठ्या ड्रोनची माहिती मिळू शकते. मात्र, दावा तर ठीक आहे पण ज्यावेळी प्रत्यक्षात युद्ध सुरू होईल, त्यावेळीच समजेल की, याची पॉवर नक्की किती आहे आणि काय.. भारताने ज्या पद्धतीने ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकड्यांचे कंबरडे मोडले त्यानंतर मोठा धसका पाकिस्तानने भारताच्या कारवाईचा घेतला. भारताने या कारवाईत फक्त दहशतवाद्यांची अड्डे उद्धवस्थ केली. सामान्य नागरिकांना इजा होणार नाही, याचीही काळजी घेतली.