AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युद्धाची खुमखुमी असलेला पाकिस्तान झाला भिकारी… इस्लामाबाद विमानतळ विकण्याची वेळ; या देशाने लावली सर्वात मोठी बोली

Pakistan: गरीबी आणि दहशतवादाने पोखरलेल्या पाकिस्तानची अवस्था दयनीय झाली आहे. पाकिस्तानला आपले एक विमानतळ विकावे लागले आहे. आता इस्लामाबाद विमानतळाचे व्यवस्थापन यूएईकडे देण्यात आले आहे.

युद्धाची खुमखुमी असलेला पाकिस्तान झाला भिकारी... इस्लामाबाद विमानतळ विकण्याची वेळ; या देशाने लावली सर्वात मोठी बोली
Islamabad Airport
| Updated on: Oct 31, 2025 | 9:36 PM
Share

गरीबी आणि दहशतवादाने पोखरलेल्या पाकिस्तानची अवस्था दयनीय झाली आहे. पाकिस्तानला आपले एक विमानतळ विकावे लागले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान बऱ्याच काळापासून राजधानी इस्लामाबाद विमानतळ दुसऱ्या देशाला चालवण्यासाठी देण्याच्या विचारात होता. यासाठी ब्रिटिश-तुर्की कन्सोर्टियमनेही एक ऑफर दिली होती, मात्र पाकिस्तानने ती नाकारली होती, आता पाकिस्तानने संयुक्त अरब अमिरातीशी करार केला आहे. त्यामुळे आता इस्लामाबाद विमानतळाचे व्यवस्थापन यूएईकडे देण्यात आले आहे. आता विमानतळातून मिळणारी रक्कम ही दोन भागात विभागला जाईल. काही पैसे पाकिस्तानला मिळतील आणि उर्वरित रक्कम ही यूएईला मिळणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

करार नेमका काय आहे?

पाकिस्तान सरकार गेल्या काही काळापासून इस्लामाबाद विमानतळ दुसऱ्या देशाकडे चालवायला देण्याच्या प्रयत्नात होते. पाकिस्तानचे विमान वाहतूक व्यवहार विभागाचे संयुक्त सचिव वसीम तारिक यांनी याबाबत सांगितले की, युएईने पाकिस्तानला एकूण महसुलाच्या 60 टक्के रक्कम देण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे आता करार अंतिम करण्याबाबत चर्चा सुरू आहे. यापूर्वी, ईआरजी यूके आणि तुर्कीच्या टर्मिनल यापीने यांनी पाकिस्तानला 40 % रक्कम देण्याची ऑफर दिली होती, मात्र पाकिस्तान सरकारने ती नाकारली होती.

आणखी दोन विमानतळांचा लिलाव होणार

समोर आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान एकूण 3 विमानतळांचे व्यवस्थापन दुसऱ्या देशाकडे सोपवण्याच्या प्रयत्नात आहे. यातील इस्लामाबाद विमातळाबाबत करार अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर आता लाहोर आणि कराची ही दोन विमानतळेही दुसऱ्या देशांकडे सोपवली जाणार आहेत. यासाठी आर्थिक सल्लागारांची नियुक्ती केली जात आहे. या विमानतळांमधूनही पाकिस्तानला चांगला आर्थिक नफा होण्याची शक्यता आहे.

आयएमएफकडून पाकिस्ताना आणखी कर्ज मिळणार

पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आहे, तरीही आयएमएफ डिसेंबरपर्यंत पाकिस्तानला $1.2 अब्ज कर्ज देण्याची शक्य़ता आहे. काही दिवसांपूर्वी आयएमएफने पाकिस्तानला पैशांचा अपव्यय थांबवण्याचा आणि अर्थव्यवस्था सुधारण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे आता खाजगीकरण आयोगाचे सचिव उस्मान बाजवा यांनी म्हटले की, डिसेंबरपर्यंत पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सची विक्री करण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे पाकिस्तानला आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.