
रशियाने पाकिस्तानची चोरी पकडली आहे. पण त्यातून भारताला हादरवणारं सत्य समोर आलं आहे. रशिया आणि पाकिस्तानचे संबंध अलीकडे सुधारत होते. पण पाकिस्तानने सवयीप्रमाणे आपली लायकी दाखवून दिली. रशियात पाकिस्तानच्या हेरगिरी नेटवर्कचा पर्दाफाश झाला आहे. ISI च्या या सिक्रेट नेटवर्कवर S 400 ची माहिती गोळा करण्याचा आरोप आहे. भारतासाठी ही माहिती हादरवणारी आहे. कारण भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिममधील S 400 हे महत्वाचं शस्त्र आहे. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी S 400 मुळेच पाकिस्तानच एकही बॅलेस्टिक मिसाइल भारतापर्यंत पोहोचू शकलं नव्हतं. उलट S 400 ने 300 किलोमीटर अंतरावरील पाकिस्तानच टेहळणी विमान पाडलं. पाकिस्तानकडे अजूनही S 400 एअर डिफेन्स सिस्टिमच उत्तर नाहीय. त्यामुळे भारतासाठी ही मूळापासून हादरवणारी बातमी आहे.
ISI रशियाची संवेदनशील संरक्षण टेक्नोलॉजी चोरण्याचा प्रयत्न करत होता. या खुलाशानंतर पाकिस्तान हडबडला आहे. त्यांनी भारतावर उलटा आरोप केला आहे. पाकिस्तानने हे आरोप फेटाळून लावले आहेत. मॉस्कोमधील पाकिस्तानी दूतावासाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. “हे वृत्त निराधार आहे. पाकिस्तान-रशिया दीर्घकालीन मैत्रीपूर्ण, सहकार्यात्मक द्विपक्षीय संबंध बिघडवण्यात असमर्थ असलेल्या टीकाकारांची हताशा यातून दिसून येते” असं रशियातील पाकिस्तानी दूतावासाने म्हटलं आहे. “पाकिस्तान-रशिया संबंध परस्पर सन्मान, विश्वास आणि दोन्ही देशांच्या हितांवर आधारीत आहेत” असं पाकिस्तानने म्हटलय.
पाकिस्तानची चोरी कशी पकडली गेली?
रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग शहरातून एका रशियन नागरिकाला अटक करण्यात आली होती. तो सैन्य हेलिकॉप्टरची टेक्नोलॉजी आणि एअर डिफेन्स प्रणालीशी संबंधित कागदपत्र आणि सैन्य हेलिकॉप्टर संबंधीच्या माहितीची तस्करी करण्याचा प्रयत्न करत होता. ISI ने एस-400 शी संबंधित माहिती तस्करीद्वारे मिळवण्याचा प्रयत्न केला. S 400 सध्याच्या घडीला भारताच सर्वात भरवशाचं अस्त्र आहे. मिसाइल, फायटर जेट्स पाडण्याची या एअर डिफेन्स सिस्टिमची क्षमता आहे. Mi8AMTSh हेलीकॉप्टरची टेक्निक सुद्धा चोरण्याचा प्रयत्न केला. Mi8AMTSh टर्मिनेटरची एक आधुनिक आवृत्ती आहे. पाकिस्तानची नजर रशिया MI8 AMTShV (VA) सैन्य हेलीकॉप्टरवर सुद्धा आहे.