AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India-Pakistan : अणूबॉम्बचा माज दाखवणाऱ्या पाकिस्तानवर तीच अणवस्त्र लपवण्याची आली वेळ, कारण…

भारताची रणनितीक आणि कूटनितीक स्तरावर भूमिका खूप आक्रमक आहे, त्यामुळे पाकिस्तानच्या मनात दहशत आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी UNSC च्या 7 अस्थायी सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांना फोन केले. यात अल्जीरिया, ग्रीस, गुयाना, पनामा, सिएरा लियोन, स्लोवेनिया आणि सोमालिया हे देश आहेत. चर्चेदरम्यान परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी या देशांना आतंकिस्तान विरुद्ध पुरावे दिले.

India-Pakistan : अणूबॉम्बचा माज दाखवणाऱ्या पाकिस्तानवर तीच अणवस्त्र लपवण्याची आली वेळ, कारण...
India-Pakistan
| Updated on: May 01, 2025 | 10:06 PM
Share

पाकिस्तान सध्या चहूबाजूंनी तणावाखाली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान, मंत्री, नेते, सेनाप्रमुख सगळे टेन्शनमध्ये आहेत, कारण त्यांना माहित आहे, भारत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेऊन राहणार. पाकिस्तानवर भारताचा प्रहार कधीही होऊ शकतो. हल्ल्याच्या भितीने पाकिस्तानचे नेते इतके गोंधळून गेले आहेत की, ते भारतात सारखी अणवस्त्र हल्ल्याची धमकी देत आहेत. पाकिस्तानकडून एकाबाजूला अणवस्त्र हल्ल्याची धमकी दिली जात आहे, तर दुसऱ्याबाजूला पाकिस्तान आपली अणवस्त्र लपवत आहे. पाकिस्तान असं यासाठी करतोय, कारण त्यांच्या अणवस्त्रांवरच हल्ला होऊ शकतो.

पाकिस्तानची अणवस्त्र सेंटरवर सध्या प्रचंड तणाव आहे. त्यांच्या अणवस्त्रांच्या बेसला धोका आहे. यात कहुटा, गडवाल, फतह जंग, वाह, शाका दारा, चश्मा, खुशाब, डेरा गाजी खान आणि निलोर हे बेस आहेत. कराचीजवळचा मासरूर एअरबेस हा अणूबॉम्ब घेऊन जाणाऱ्या विमानांसाठी बेस आहे. पाकिस्तानच्या या दहा अणवस्त्र केंद्रांवर हल्ल्याचा धोका आहे. पाकिस्तानची अणवस्त्र कुठल्या दोन फ्रंटवरुन उद्धवस्त होऊ शकतात, ते जाणून घ्या.

पाकिस्तानकडे किती अणूबॉम्ब?

पाकिस्तानच्या अणवस्त्रांना आतापर्यंतचा सर्वात मोठा धोका उत्पन्न झाला आहे. फेडरेशन ऑफ अमेरिकन सायटिस्ट्सच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानकडे 170 अणूबॉम्ब आहेत. पाकिस्तानच्या या अणवस्त्रांवर आणि अणू केंद्रांना धोका आहे. भारत या अणवस्त्र तळांना लक्ष्य करेल ही भिती पाकिस्तानच्या मनात आहे. दुसरी भिती TTP ची आहे. त्यांची सुद्धा पाकिस्तानच्या अणवस्त्रांवर नजर आहे.

पाकिस्तानच्या अणवस्त्रांवर अजून कोणाची नजर?

तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान म्हणजे TTP कडून पाकिस्तानवर हल्ले सुरु आहेत. TTP पाकिस्तानला त्यांच्या अणवस्त्र साठ्यापर्यंत पोहोचायचं आहे. एकाबाजूला टीटीपी आणि दुसऱ्याबाजूला भारत. या दुतर्फा धोक्यामुळे पाकिस्तानने आपली अणवस्त्र दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केली आहेत. त्यांची सुरक्षा सुद्धा वाढवली आहे. पाकिस्तान फक्त अणवस्त्रच नाही, तर त्या सर्व मोठ्या शस्त्रांना लपवत आहे, ज्यांना भारत टार्गेट करु शकतो.

ग्वादर बंदर का रिकामी केलं?

पाकिस्तानने त्यांची F-16 फायटर विमान सुद्धा लपवली आहेत. आपल्या युद्धनौकांची जागा सुद्धा बदलली आहे. पाकिस्तानला भिती आहे की, भारत ग्वादर बंदरावर हल्ला करेल. त्यामुळेच ग्वादर बंदरातून त्यांनी सर्व युद्धनौका हलवल्या आहेत. काही दिवसांपूर्वी येथे पाकिस्तानची 7 जहाजं होती. आता ग्वादर बंदर रिकामी आहे.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.