AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mecca Pact : डरपोक पाकिस्तान मागे हटला, शेवटी सौदी अरेबियाच्या रक्षणासाठी पुढे आला मुस्लिम देशांचा कट्टर शत्रू देश

Mecca Pact : सौदी अरेबिया सध्या संकटात आहे. अशावेळी करार असूनही डरपोक पाकिस्तान मागे हटला आहे. अशावेळी सौदी अरेबियाच्या रक्षणासाठी मुस्लिम देशांचा कट्टर शत्रू देश पुढे आला आहे.

Mecca Pact : डरपोक पाकिस्तान मागे हटला, शेवटी सौदी अरेबियाच्या रक्षणासाठी पुढे आला मुस्लिम देशांचा कट्टर शत्रू देश
Mecca Pact
| Updated on: Sep 16, 2026 | 2:53 PM
Share

मध्य पूर्वेत मागच्या काही महिन्यांपासून असलेला तणाव अजूनही कायम आहे. इराण आणि अमेरिकेकडून कधीही परस्परांवर हल्ले सुरु असतात. त्यात आता हूती बंडखोर आणि सौदी अरेबियामध्ये युद्ध पेटलं आहे. हूती बंडखोरांकडून सौदी अरेबियाच्या शहरावर मिसाइल हल्ले सुरु आहेत. त्यामुळे सौदी अरेबिया अडचणीत आहे. अशावेळी सौदी अरेबियाचा जवळचा मित्र असणाऱ्या पाकिस्तानने हात वर केले आहेत. सौदी अरेबियासाठी पाकिस्तान जवळचा देश आहे. सौदी अरेबियाने नेहमीच पाकिस्तानला मदत केली आहे. या देशांनी परस्परांच्या रक्षणासाठी मक्का करार केला. या मक्का करारातंर्गत कुठल्या एकादेशावरील हल्ला हा दोन्ही देशांवरील हल्ला मानला जाईल. पण हा करार फक्त कागदावरचा असल्याचं स्पष्ट झालय. कारण हूती बंडखोरांकडून सौदीवर हल्ले सुरु असताना पाकिस्तान या युद्धात हात घालणार नाही हे स्पष्ट झालय.

सौदी अरेबियासाठी अशी संकटकालीन स्थिती असताना इस्रायल सौदी अरेबियाच्या मदतीसाठी पुढे आला आहे. इस्रायलला अरब मुस्लिम देश आपला कट्टर शत्रू मानतात. सौदीने सुद्धा नेहमीच इस्रायलच्या अस्तित्वाला विरोध केला आहे. पण तोच इस्रायल आता सौदी अरेबियाला मदतीचा हात देणार आहे. इस्रायल सौदी अरेबियाला ISR म्हणजे गुप्त माहिती, टेहळणी आणि हुती बंडखोरांची ओळख पटवून देणं अशा स्वरुपाची मदत करणार आहे. सौदी अरेबियाने अमेरिकेच्या माध्यमातून इस्रायलकडे ही मदत मागितली होती. हुती बंडखोरांची मजल इतकी वाढलीय की, त्यांनी ड्रोनच्या माध्यमातून मक्का शहरावर हल्ल्याचा प्रयत्न केला. या ड्रोनला स्फोट होण्याआधीच रोखण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.

पाकिस्तानने काय म्हटलेलं?

अमेरिकी मिडिया संस्था एक्सियोस नुसार, पाकिस्तान आणि तुर्कीकडून मदत मिळणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर सौदी अरेबियाने हुती बंडखोरांविरोधात लढण्यासाठी इस्रायलकडे मदत मागितली आहे. सौदी आणि इस्रायलमध्ये पहिल्या फेरीची चर्चा सुद्धा झाली आहे. इस्रायलने हुती बंडखोरांविरुद्ध गोपनीय माहिती उपलब्ध करुन द्यावी अशी सौदीची मागणी आहे. जेणेकरुन त्यांना आधीच रोखता येईल. सौदी अरेबियाने पाकिस्तानसोबत मक्का करार केला होता. पाकिस्तानचे सैन्य प्रमुख आसिम मुनीर म्हणालेले की, ‘मक्केच्या सुरक्षेसाठी आम्ही सौदीसोबत करार केला आहे’ आधी पाकिस्तान या युद्धात उतरणार असं म्हटलं जात होतं. पण पाकिस्तान आता मागे हटला आहे.

Follow Us
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक