
India Pakistan Relations : पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी पहलगामध्ये हल्ला केल्याच्या घटनेपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध चांगलेच ताणलेले आहेत. भारत सध्या पाकिस्तानविरोधात कोणत्याही प्रकारचा व्यापर करत नाही. सोबतच पाकिस्तानने भविष्यात कोणतीही आगळीक केली तर आम्ही त्याला जशास तसे उत्तर देऊ, असे भारताने खडसाऊन सांगितलेले आहे. पाकिस्तान मात्र भारतासोबत मैत्रीसंबंध नव्याने वाढवण्यासाठी फारच उतावीळ झालेला आहे. भारताचे परराष्ट्रममंत्री एस. जयशंकर बांगलादेशमध्ये गेल्यानंतर त्यांनी पाकिस्तानी संसदेचे अध्यक्ष सरदार अयाज सादिक यांच्याशी हस्तांदोलन केले. याच एका कृतीचा आधार घेऊन पाकिस्तानला भारतासोबत मैत्री करण्याचे स्वप्न पडू लागले आहेत. भारताने मात्र या हस्तांदोलनानंतर आपली भूमिका स्पष्ट करून पुन्हा एकदा पाकिस्तानला त्यांची जागा दाखवली आहे. पाकिस्तानला भारताने पुन्हा उघडे पाडले आहे.
भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर हे बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा जिया यांच्या अंत्यसंस्काराला गेले होते. यावेळी पाकिस्तानी संसदेचे अध्यक्ष सरदार अयाज सादिक हेदेखील बांगलादेशमध्ये पोहोचले होते. यावेळी सरदार अयाज सादिक आणि एस जयशंकर यांच्यात काही वेळेसाठी भेट झाली. दोघांनीही हस्तांदोलन केले. परंतु याच हस्तांदोलन आणि भेटीची मदत घेत पाकिस्तानने अनेक मोठे दावे केले आहेत. पाकिस्तानच्या नॅशनल असेंबली सचिवालयाने यावर प्रतिक्रिया दिली आहे. सादिक जिया शोक पुस्तिकेत शोक संदेश लिहिण्यासाठी गेले होते. त्यावेळी एस जयशंकर उपस्थित होते. एस जयशंकर यांनी सादिक यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत भारताचे इतरही काही प्रतिनिधी होते, असे या सचिवालयाने म्हटले आहे.
सोतबच 2025 सालातील पहलगाम घटनेनंतर ही पहिलीच महत्त्वपूर्ण आणि उच्चस्तरीय भेट होती. पाकिस्तानने पहलगाम हल्ल्याच्या चौकशीसाठी संवाद आणि सहयोगाच्या भूमिकेवरच जोर दिलेला आहे, असेही सचिवालयाने स्पष्ट केले. भारताने मात्र ही भेट फक्त शिष्टाचाराचा एक भाग होती. बांगलादेशात सगळीकडे शोकस्थिती लक्षात घेऊन सर्व शिष्टाचारांचे पालन करण्यात आले, असे भारताने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता भारत आणि पाकिस्तान यांच्यतील संबंध या भेटीनंतर सुरळीत होणार की आहे तशीच स्थिती कायम राहणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.