
तुर्कीने भारतासोबत झालेल्या संघर्षात पाकिस्तानची प्रत्येक प्रकारे मदत केली. कूटनितीक, त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचा बचाव असो किंवा सैन्य मदत प्रत्येक प्रकारे तुर्कीने पाकिस्तानची मदत केली. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ तुर्कीचे राष्ट्रपती एर्दोगन यांना भाऊ-भाऊ म्हणून थकत नाहीयत. आता पाकिस्तानने सुद्धा तुर्कीच कर्ज फेडलं आहे. पाकिस्तान आणि तुर्कीच्या गुप्तचर संस्थेने मिळून दाएश चीफ ऑपरेटिव ओजगुर अल्तुनला अटक केली. तुर्कीसाठी ओजगुर अल्तुन मोठा वॉटेंड आरोपी होता. तुर्कीची राष्ट्रीय गुप्तचर संघटना MIT आणि पाकिस्तानच्या ISI ने संयुक्त अभियान राबवून पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर ओजगुर अल्तुनला पकडलं.
तुर्कीच्या मीडियामध्ये अल्तुन ‘अबू यासिर अल तुर्की’च्या नावाने ओळखला जातो. तो दाएशचा एक प्रमुख कार्यकर्ता आहे. समूहाच मीडिया प्रवक्ता सुद्धा त्याला म्हटलं होतं. दाएशने तुर्की विरोधात अनेक हल्ले घडवून आणले. ही अटक म्हणजे दोन्ही देशांच्या गुप्तचर संस्थांमध्ये सहकार्याच पहिलं हाय-प्रोफाइल प्रदर्शन आहे. दाएशपासून तुर्कीला दहशतवादाचा मोठा धोका आहे.
भारतासाठी टेन्शन वाढवणारी बाब
या अटकेवरुन एक गोष्ट स्पष्ट झालीय तुर्की आणि पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा मिळून काम करत आहेत. यांचं जाळ अफगाणिस्तानपर्यंत पसरलेलं आहे. त्यामुळे या दोन्ही संघटना मिळून भारताविरोधात कट रचू शकतात.
दाएशपासून कोणा-कोणाला धोका?
मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात तुर्कीच्या सुरक्षा यंत्रणांनी दाएशशी कथित संबंधांच्या संशयावरुन 32 संशयितांना ताब्यात घेतलं होतं. चर्चसह इराकी दूतावासावर ते हल्ल्याची योजना आखत होते. दाएशपासून तुर्कीशिवाय सीरियाला सुद्धा मोठा धोका आहे.