पाकिस्तानची उडाली घाबरगुंडी, थेट घेतला मोठा निर्णय, पाकव्याप्त काश्मीरमध्ये आता..
पाकव्याप्त काश्मीरमध्ये लोकांवरील अत्याचार प्रचंड वाढत आहेत. त्यातच आता पाकिस्तानने स्वत:च्या काही गोष्टी लपवण्यासाठी मोठा निर्णय घेतला. भारताने पाकिस्तानच्या या निर्णयाविरोधात आवाज उठवला आहे.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठा हिंसाचार होताना दिसतोय. काही दिवसांपूर्वीच सुरक्षा दलाकडून सर्वसामान्य नागरिकांवर गोळीबार करण्यात आला, ज्याचे काही व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाली. पाकव्याक्त काश्मीरचे लोक सरकारविरोधात रस्त्यावर उतरत आहेत. महागाई, बेरोजगारी आणि विजेच्या वाढलेल्या दराविरोधात लोक रस्त्यावर उतरले. यादरम्यानच आता पाकव्याप्त काश्मीरमधील बनावट निवडणूक प्रक्रियेचे पितळ पुन्हा उघडकीस आले. पाकव्याप्त काश्मीरमध्ये लोकांचा संताप तीव्र होत असताना कायदा-सुव्यवस्थेची स्थिती असतानाच PoK निवडणूक आयोगाने विधानसभेच्या सात जागांसाठी होणाऱ्या मतदानाचा तिसरा टप्पा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला आहे. हा एक मोठा निर्णय म्हणावा लागेल. यातून पाकिस्तानी सरकारचे खरे रूप पुढे आले.
यादरम्यानच आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया फेटाळून लावली. पाकिस्तानच्या बेकायदेशीर ताब्यावर पांघरूण घालण्याच्या उद्देशाने रचलेले हे एक ढोंग असल्याचे भारताने म्हटले. पाकव्याप्त काश्मीरमध्ये लोक विविध मागण्यांसाठी मोठे आंदोलन उभे करत आहेत. त्यातच जर आता निवडणुका झाल्या तर पाकिस्तानचा घरा चेहरा जगापुढे येऊ शकतो, ही त्यांना भीती आहे.
पीओके निवडणूक आयोगाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, पुंछ आणि सुधनोटीमधील एकून सात विधानसभा जागेसाठी 10 ऑगस्ट रोजी मतदान होणार नाही. या भागात हिंसाचार आणि बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती यामुळे गृहसचिवांकडून प्राप्त झालेला अहवाल यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यात, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. पाकिस्तानी सरकारविरोधात पीओकेतील नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. दररोज आंदोलने केले जात आहेत.
त्यातच आता याच्याच भीतीने थेट निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय शुल्क कारणे दाखवून घेण्यात आला. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुरू असलेल्या बनावट निवडणूक प्रक्रिया म्हणजे पाकिस्तानचा बेकायदेशीर ताबा आणि मानवी हक्क्यांचे गंभीर उल्लंघन लपवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले. पाकव्याप्त काश्मीरमध्ये नागरिकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठे अत्याचार होत आहेत. त्यातच आता निवडणुकाही पुढे ढकलण्यात आल्यात.