AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इटलीत बुरखा बंदीची तयारी, जगात कोणकोणत्या देशांत आहेत निर्बंध ?

इटलीने आता सार्वजनिक ठिकाणी आणि शाळांमध्ये बुरखा, नकाबवर बंदी घातली आहे. जगभरातील २४ हून अधिक देशांमध्ये बुरखा किंवा चेहरा झाकण्यावर पूर्ण किंवा अंशतः प्रतिबंध आहेत. कोणते आहेत ते देश ?

इटलीत बुरखा बंदीची तयारी, जगात कोणकोणत्या देशांत आहेत निर्बंध ?
| Updated on: Sep 22, 2026 | 7:39 PM
Share

फ्रान्स आणि बेल्जियम यांच्या मागोमाग आता इटलीनेही त्यांच्या देशात सार्वजनिक ठिकाणी तसेच शाळांमध्येही बुरखा आणि नकाबवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी नुकतीच एक सार्वजनिक कार्यक्रमात याबद्दल अधिकृत घोषणा केली. यापूर्वी गेल्याच महिन्यात आणखी एक युरोपियन देश पोर्तुगालनेही बुरख्यावर बंदी घातली होती. इटलीतील या घोषणेनंतर या निर्णयाबद्दल बरीच चर्च होत आहे. मात्र याप्रमाणेच जगातील आणखी कोणते आणि किती देश आहेत जिथे बुरख्यावर पूर्णपणे किंवा आंशिक प्रतिबंध आहे, ते जाणून घेऊया.

युरोपातला पहिला देश कोणता ?

यूरोपमध्ये चेहरा झाकण्यावर बंदी घालण्याची सुरुवात फ्रान्सने केली होती. 2011 साली सार्वजनिक ठिकाणी संपूर्ण चेहरा झाकण्यास बंदी घालणारा फ्रान्स हा पहिला युरोपियन देश ठरला . तर आजच्या काळात युरोपमध्ये असे अनेक देश आहेत जिथे सार्वजनिक ठिकाणी किंवा शाळा, कॉलेजेस अथवा सुरक्षा-संवेदनशील ठिकाणी बुरखा घालण्यास बंदी आहे.

याउलट, स्वीडनमध्ये मात्र धार्मिक पोशाखावर कोणतीही बंदी नाही आणि सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालणं हे अजूनही मान्य आहे. तेथील राष्ट्रीय धोरणानुसार वैयक्तिक अधिकारांना प्राधान्य दिलं जातं. असं असलं तरी काही नगरपालिकांनी एकात्मता आणि लैंगिक समानतेचा हवाला देत, शाळांमध्ये विशिष्ट निर्बंध लागू करण्याचा प्रयत्न केला. या मुळे बरेच वाद विवाद झाले असले तरीही राष्ट्रीय धोरणात आत्तापर्यंत कोणताही मोठा बदल झालेला नाही.

संपूर्ण जगात 24 देशांनी सार्वजनिक ठिकाणी पूर्ण चेहरा झाकणारे कपडे म्हणजे बुरखा घालण्यावर काही प्रकारचे निर्बंध लादले आहेत. मात्र बहुतांश प्रकरणात ही बंदी केवळ सार्वजनिक इमारती किंवा सार्वजनिक ठिकाणीच लागू आहे.

या देशांमध्ये बुरख्यावर आहे बंदी

विशेष म्हणजे, या देशांमध्ये लोकशाही व्यवस्था असलेले तसेच हुकूमशाही शासन असलेले देश, तसेच मुस्लिमबहुल आणि गैर-मुस्लिमबहुल देशांचा देखील समावेश आहे. ते देश म्हणजे – अल्जेरिया, ऑस्ट्रिया, अझरबैझान, बेल्जियम, बुल्गारिया, कॅनडा, चाड, चीन, डेन्मार्क, फ्रान्स, गॅबॉन, कोसोवो, किर्गिझस्तान, लाटव्हिया, लक्झेंबर्ग, नेदरलँड्स, नॉर्वे, श्रीलंका, स्वित्झर्लंड, ताजिकिस्तान, ट्युनिशिया, तुर्कमेनिस्तान, तुर्की आणि उझबेकिस्तान – अशी त्यांची नावं आहेत.

याच देशांच्या लिस्टमध्ये आता इटलीचाही समावेश होणार आहे. इटलीमध्ये वाढत्या स्थलांतरितांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठीही उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच, इटलीमध्ये यापूर्वीपासूनच सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यास मनाई आहे.

Follow Us
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?
आंदोलनाची परवानगी नाकारली तर...; रोहित पवारांचा एल्गार
Rohit Pawar : आंदोलनाची परवानगी नाकारली तर...; आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर रोहित पवारांचा एल्गार
बावनकुळे, जिभेवर लगाम घाला...बावनकुळेंच्या टीकेला यशोमती ठाकूर....
Yashomati Thakur : बावनकुळे, जिभेवर लगाम घाला...बावनकुळेंच्या टीकेला यशोमती ठाकूरांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाल्या...