
नैरोबीः केनियातील नैरोबी (nairobi) येथे पाकिस्तानी पत्रकार अर्शद शरीफ (Journalist arshad sharif) यांची गोळ्या घालून हत्या (Murder) करण्यात आल्याची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी केलेल्या या गोळीबारात अर्शद शरीफ जागीच ठार झाला. गेल्या काही दिवसांपासून अर्शदच्या जीवाला धोका असल्याचे सांगण्यात आले होते. म्हणूनच तो पाकिस्तानातून दुबईला पळून गेला होता. त्यानंतर जीव वाचवण्यासाठी म्हणून त्याने केनियाला गेला होता. आणि त्याच केनियातील नैरोबीमध्ये पोलिसांनी गोळी घालून पत्रकार अर्शद शरीफची हत्या केली गेली आहे.
अर्शद शरीफला या आधीच आपली हत्या केली जाणार असल्याचा संशय आला होता. तसेत काही अफगाण मारेकरीही त्याला मारण्यासाठी त्याच्या मागावर होते. त्यामुळे अर्शदने आधी आपला देश पाकिस्तान सोडला होता.
आपल्या जीवावा धोका असल्याचे त्याच्या लक्षात आल्यावर आपला जीव वाचवण्यासाठी त्याने आपला मुक्काम दुबईला हलविला होता.
मात्र त्या ठिकाणी गेल्यावर त्याच्या मित्रांनी सांगितले की त्याचे दुबईतील लोकेशनही ट्रेस झाले आहे. त्यामुळे तिथे राहणे धोक्याचे असल्याचे सांगण्यात येत होते.
यानंतर अर्शद शरीफने दुबईहून केनियाला जाण्याचा निर्णय घेतला. मात्र रविवारी रात्री नैरोबीमध्ये पोलिसांच्या गोळीबारात तो मारला गेला असल्याची माहिती देण्यात आली.
अर्शद शरीफ हे अनेक दिवसांपासून वादात होते. खरे तर याच वर्षी ऑगस्टमध्ये अर्शद शरीफ यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
त्याच्याबरोबरच एआरवाय डिजिटल नेटवर्कचे अध्यक्ष, सीईओ सलमान इक्बाल, न्यूज कंटेंटचे प्रमुख अम्माद युसूफ यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) नेते डॉ. शाहबाज गिल यांच्या मुलाखतीवरूनच वाद झाला होता. त्यानंतर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हाही दाखल केला गेला होता.
या कारणास्तव त्यावेळी वाहिनीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ रद्द करण्यात आले होते. त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.
त्यामुळेच त्याने देश सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता त्याची हत्या केली गेल्याने अनेकांना या घटनेमुळे धक्का बसला आहे. त्याची पत्नी आणि त्याचे जुने सहकाऱ्यांना हा मोठा धक्का असल्याचे सांगण्यात आले आहे.