पाकिस्तानची अत्यंत मोठी घोषणा, थेट चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग लवकरच…

भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कायमच तणावात राहिली. अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लावल्यानंतर पहिल्यांदाच भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावात आहेत. यादरम्यान पाकिस्तान अमेरिकेला हाताशी धरून मोठ्या गोष्टी घडवून आणत आहे.

पाकिस्तानची अत्यंत मोठी घोषणा, थेट चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग लवकरच...
Shehbaz Sharif and Xi Jinping
| Updated on: Jan 20, 2026 | 12:54 PM

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान अमेरिकेसोबतचे संबंध चांगले करत आहे. सतत पाकिस्तानचे पंतप्रधान अमेरिका दाैऱ्यावर जात आहे. हेच नाही तर मोठी आमिष दाखवून डोनाल्ड ट्रम्प यांना पाकिस्तानमध्ये पैशांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. फक्त अमेरिकाच नाही तर चीनसोबतही जवळीकता वाढवण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जात आहे. पुतिन दोन दिवसीय भारत दाैऱ्यावर आल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट बघायला मिळाला. पुतिन आतापर्यंत एकदाही पाकिस्तान दाैऱ्यावर गेले नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि एका शिखर परिषदेमध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी पुतिन यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. आता यादरम्यानच्या घडामोडींमध्येच पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी अत्यंत मोठी घोषणा केली. शरीफ यांनी म्हटले की, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग लवकरच पाकिस्तानला भेट देणार आहेत.

चीनकडून या दाैऱ्याबद्दल अजून काही भाष्य करण्यात आले नाहीये. ही भेट अशावेळी होत आहे, ज्यावेळी पाकिस्तान आणि अमेरिकेतील संबंध अधिक मजबूत होत आहेत. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लावला. यादरम्यानच पाकिस्तानने मोठा गेम खेळत थेट अमेरिकेसोबत जवळीकता वाढवली. भारत आणि अमेरिकेतील मैत्री गेल्या अनेक वर्षांपासून आहे. मात्र, टॅरिफच्या मुद्द्यावर संबंध ताणले आहेत.

अमेरिकेसोबत पाकिस्तानची वाढलेली जवळीकता चीनला फार काही आवडली नाही. काही दिवसांपूर्वी चीनने पाकिस्तानला फटकारले होते. चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यास सांगितले होते. यासोबतच मोठा इशारा देत त्यांनी म्हटले होते की, नाही तर चीनला निधी पुरवण्याबाबत पुनर्विचार करावा लागेल. चीनचे हे भाष्य ऐकून पाकिस्तानची झोप उडाली आणि थेट चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना पाकिस्तानमध्ये येण्याबाबत आमंत्रण देण्यात आले.

इस्लामाबादमध्ये झालेल्या पाकिस्तान चीन गुंतवणूक परिषदेला पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी याबाबत माहिती दिली. फक्त भारतच नाही तर अमेरिका टॅरिफ आणि रशियाकडून तेल खरेदी बंद करण्यासाठी चीनवरही दबाव टाकत आहे. यादरम्यानच पाकिस्तान स्वत:च्या स्वार्थासाठी थेट अमेरिकेसोबत जवळीकता वाढवत आहे आणि ही बाब चीनला अजिबातच पटली नाही.