Saina Nehwal Retire : अखेर सायना नेहवालने घेतला आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय
Saina Nehwal Retire : सायनाच्या करिअरमध्ये सर्वात मोठं मेडल तिने 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये मिळवलं. तिथे तिने ब्राँझ मेडल मिळवलं होतं. त्या पदकासह सायना ऑलिंम्पिकमध्ये भारतासाठी मेडल जिंकणारी पहिली खेळाडू बनली होती.

Saina Nehwal Retire : भारताची फुलराणी सायना नेहवालने बॅडमिंटनमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सायना आपला शेवटचा सामना वर्ष 2023 मध्ये खेळली होती. तेव्हापासून ती गुडघ्याच्या दुखापतीचा सामना करत होती. त्यानंतर अखेर तिने बॅडमिंटनला अलविदा म्हणण्याचा निर्णय घेतला आहे. सायनाच्या करिअरमध्ये सर्वात मोठं मेडल तिने 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये मिळवलं. तिथे तिने ब्राँझ मेडल मिळवलं होतं. त्या पदकासह सायना ऑलिंम्पिकमध्ये बॅडमिंटनच्या खेळात भारतासाठी मेडल जिंकणारी पहिली खेळाडू बनली होती.
सायना नेहवाल आपल्या निवृत्तीबद्दल बोलताना पॉडकास्टमध्ये म्हणाली की, आता मला माझं शरीर साथ देत नाहीय. अशा स्थितीत मला माझा खेळ सुरु ठेवता येणार नाही. 35 वर्षांच्या सायनाने सांगितलं की, तिने तिच्या अटींवरच बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. आत स्वत:च्या अटींवरच ती निरोप घेत आहे. गुडघे दुखीमुळे निवृत्तीचा निर्णय घेत असल्याचं सायनाने सांगितलं. खराब गुडघ्यामुळे हाय इंटेनसिटी ट्रेनिंग करणं सोपं नव्हतं असं तिने सांगितलं.
सायनाने किती मेडल मिळवलीयत ?
सायना नेहवालने 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलं होतं. त्याशिवाय अन्य बॅडमिंटन स्पर्धांमध्येही तिने पदकविजेती कामगिरी केली आहे. भारताची स्टार शटलर सायना नेहवालने ऑलिम्पिसह बॅडमिंटनच्या 7 मोठ्या इवेंटमध्ये एकूण 18 मेडल जिंकली आहेत.
एशियन चॅम्पियनशिपमध्ये 3 ब्रॉन्ज मेडल
सायना नेहवालने वर्ल्ड जूनियर चॅम्पियनशिपमध्ये दोन मेडल जिंकली आहेत. यात एक सिल्वर आणि एक ब्रॉन्ज मेडल होतं. एशियन चॅम्पियनशिपमध्ये 3 ब्रॉन्ज मेडल जिंकली. उबर कपमध्ये 2 ब्रॉन्ज मेडल आपल्या नावावर केलं. कॉमनवेल्थ गेम्समध्ये 3 गोल्डसह 5 मेडल जिंकले. यात एक सिल्वर आणि एक ब्रॉन्ज आहे. एशियन गेम्समध्ये तिने 2 ब्रॉन्ज मेडल मिळवले. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सायनाच्या नावावर एक सिल्वर आणि एक ब्रॉन्ज मेडल आहे.
सायना नेहवाल वर्ष 2015 मध्ये वर्ल्ड रँकिंगमध्ये नंबर 1 ची शटलर होती. सायनाला 2009 साली अर्जुन अवॉर्ड आणि 2010 साली मेजर ध्यानचंद पुरस्काराने सन्मानित केलं. 2010 मध्ये तिला पद्मश्री आणि 2016 साली पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित केलं.
