tv9 Marathi Special Report | मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबई महापालिकेच्या निमित्ताने मराठी अमराठी वाद सुरु असतानाच, मुंबईमध्ये बिहारचे भवन उभारलं जाणार असल्यानं एक नवीन वाद सुरु झालाय. मुंबई पोर्ट परिसरात फाईव्ह स्टार हॉटेलसारखी सुविधा असणारी 30 माजली टोलेजंग इमारत उभी केली जाणार आहे.
मुंबई महापालिकेच्या निमित्ताने मराठी अमराठी वाद सुरु असतानाच, मुंबईमध्ये बिहारचे भवन उभारलं जाणार असल्यानं एक नवीन वाद सुरु झालाय. मुंबई पोर्ट परिसरात फाईव्ह स्टार हॉटेलसारखी सुविधा असणारी 30 माजली टोलेजंग इमारत उभी केली जाणार आहे. नितीश कुमार सरकारनं यासाठी पैशाचीही तरतूद केली आहे. बिहार सरकारने या भवन साठी 314 कोटींचा निधी मंजूर केलाय. बिहार मधून येणारे राजकीय नेते, सेलिब्रिटी किंवा नागरिक यांच्या सुविधांसाठी हे भवन उभारलं जाणार आहे. पण यावरूनच महाराष्ट्राच्या राजकारणात वाद होण्याची दात शक्यता वर्तवातली जाते. मुंबईची सत्ता भाजपला कशासाठी हवी होती तेच आता सिद्ध झाल्याची टीका करत, मनसेनं बिहार भवन उभं राहून देणार नाही असा थेट इशारा दिलाय.

