मुकेश अंबानींसोबत डिज्नीलँडमध्ये दिसणारी ती पाकिस्तानी महिला कोण? सोशल मीडियावर त्या फोटोची चर्चा
शर्मिला फारुकी यांनी इंस्टाग्रामवर शेअर मुकेश अंबानी यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो व्हायरल झाला आहे. त्यांनी त्याचे कॅप्शन लिहिले - मुकेश अंबानीसह. या फोटोमध्ये मुकेश अंबानी त्यांच्या नातीसोबत दिसत आहेत.

Who is Sharmila Faruqui: रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमॅन मुकेश अंबानी सध्या परिवारासह पॅरिसमध्ये आहे. ऑल्मिपिक स्पर्धेनिमित्ती अंबानी परिवार फ्रान्समध्ये आहे. मुकेश अंबानी नुकतेच मुलगी ईशा सोबत पॅरीसमधील डिज्नीलँडमध्ये दिसले होते. त्यानंतर मुकेश अंबानी यांच्यासोबत एका महिलेचा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. त्या फोटोची चर्चा भारतच नव्हे तर पाकिस्तानमध्येही सुरु आहे. आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्यासोबत ती महिला कोण आहे? त्याची चर्चा होत आहे. मुकेश अंबानीसोबत दिसणारी ती महिला पाकिस्तानमधील राजकीय नेत्या शर्मिला फारुकी आहे.
पाकिस्तानमधील शर्मिला फारुकीने मुकेश अंबानी सोबतचा पॅरिसमधील डिज्नीलँडचा फोटो शेअर केला आहे. त्यात मुकेश अंबानी त्यांच्या नातीला कडेवर घेतलेले दिसत आहे. तो फोटो शर्मिला फारुकी यांनी शेअर केला आहे. यापूर्वी शर्मिला यांना ईशा अंबानी यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.




कोण आहे शर्मिला फारुकी
शर्मिला साहिबा फारूकी पाकिस्तानमधील राजकीय नेत्या आहेत. बिलावल-भुट्टो झरदारी यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीत त्या आहेत. पाकिस्तानमधील सिंध प्रांतात 25 जानेवरी 1978 मध्ये त्यांचा जन्म झाला. त्या सिंध क्षेत्रात निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. त्यांना चांगली राजकीय पार्श्वभूमी आहे. त्यांचे आजोबा एन एम उकैली पाकिस्तानचे अर्थमंत्री राहिले होते. पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांचे विश्वासू सलमान फारूकी यांची शर्मिला पुतणी आहे. शर्मिलीचे वडील उस्मान फारुकी पीपीईचे नेते होते. 1981 ते1996 दरम्यान ते पाकिस्तान स्टील मिल्सचे चेअरमन होते. 2021 मध्ये त्यांचे निधन झाले.
शर्मिली यांनी एबीए पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी कायद्यात पीएचडीची पदवी पूर्ण केली आहे. शर्मिली यांनी हशाम रियाज शेख यांच्याशी 2015 मध्ये लग्न केले. त्यांचे लग्न पाकिस्तानमधील सर्वात महाग लग्न ठरले होते. या दोघांना आता सहा वर्षांचा मुलगा आहे.
View this post on Instagram
शर्मिला फारुकी यांनी इंस्टाग्रामवर शेअर मुकेश अंबानी यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो व्हायरल झाला आहे. त्यांनी त्याचे कॅप्शन लिहिले – मुकेश अंबानीसह. या फोटोमध्ये मुकेश अंबानी त्यांच्या नातीसोबत दिसत आहेत. डिस्नेलँडमध्ये फिरत असताना मुकेश अंबानी आणि पाकिस्तानी महिला नेत्यांची भेट झाली, त्यादरम्यान हा फोटो घेण्यात आला.