जग हादरलं! आज रात्री इराणवर हल्ला होणार… मोठी खळबळ, धमक्यांमध्ये..

मागील काही दिवसांपासून अमेरिका आणि इराणमधील संबंध तणावात आहेत. अमेरिका सातत्याने इराणवर हल्ला करण्याची धमकी देत आहे. त्यामध्येच आता मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळत आहे.

जग हादरलं! आज रात्री इराणवर हल्ला होणार... मोठी खळबळ, धमक्यांमध्ये..
America attack Iran
| Updated on: Feb 01, 2026 | 2:29 PM

गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेत तणाव वाढल्याचे बघायला मिळाले. इराणला अमेरिका सातत्याने धमक्या देत आहे. कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला केला जाऊ शकतो, असे सांगितले जात होते. यादरम्यानच इराणने स्पष्ट शब्दात म्हटले की, आमच्यावर हल्ला केला तर आम्ही हल्ला करणाऱ्याचे हात तोडू आणि संपूर्ण जगाला उद्धवस्थ करू. इराणच्या या धमकीने जगभरात खळबळ उडाली. अमेरिका सातत्याने इराणच्या दिशेने पाऊस पुढे टाकताना दिसत आहे. अमेरिकेच्या हल्ल्याच्या शक्यतेमुळे इराणमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण वाढत आहे. इराणमध्ये लोक सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरले. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट या आंदोलनात उडी घेत म्हटले की, इराणच्या लोकांचा लढा शेवटच्या टप्प्यात असून विजयाच्या अत्यंत जवळ ते आहेत. अमेरिकेची मदत त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी यादरम्यान इराण सरकारवर देखील टीका केली होती. इराण सरकारने लवकरात लवकर सत्ता सोडावी, असे थेट डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते. आता नुकताच मोठी खळबळ उडवणारी माहिती पुढे येताना दिसत आहे. 30 जानेवारीच्या रात्री अंधार पडताच, अमेरिका कधीही लष्करी कारवाई करू शकते अशी भीती इराणी लोकांमध्ये पसरली होती.

30 जानेवारीच्या रात्री आज हल्ला होणार म्हणून इराणी लोक रात्रभर झोपलेच नाहीत. हरनमध्ये राहणारा अभियंता मिलाद याने म्हटले की, त्या रात्री आम्ही सकाळपर्यंत झोपूच शकलो नाही. सोशल मीडियावर 30 जानेवारी रोजी अमेरिका इराणवर हल्ला करणार असल्याचे सांगितले जात होते. यामुळे लोक भीतीने अजिबात झोपलेच नाहीत, रात्रभर भीतीत होते. अमेरिका कोणत्याही क्षणी हल्ला करेल यामुळे लोक घाबरले होते.

आज कोणत्याही परिस्थितीमध्ये अमेरिका आपल्यावर हल्ला करणार असल्याची चर्चा इराणी लोकांमध्ये होती. यामुळे लोक रात्रभर जागेच होते. हेच नाही तर काही लोकांनी आपल्या महत्वाच्या वस्तूही आपल्या जवळच ठेवल्या होत्या. सकाळपर्यंत लोकांमध्ये भीती कायम होती. ज्यावेळी सकाळी सूर्याचा प्रकार दिसला, त्यावेळी लोक निवांत होऊन झोपले.