AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्याची बायको सुंदर आणि लयभारी वाटली म्हणून मंत्रीपद दिले… डोनाल्ड ट्रम्प यांचा धक्कादायक खुलासा, थेट…

डोनाल्ड ट्रम्प हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच एक मोठा खुलासा केला, त्याचे पडसाद थेट जगभरात बघायला मिळत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

त्याची बायको सुंदर आणि लयभारी वाटली म्हणून मंत्रीपद दिले... डोनाल्ड ट्रम्प यांचा धक्कादायक खुलासा, थेट...
Donald Trump
| Updated on: Jan 31, 2026 | 12:46 PM
Share

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कायमच चर्चेत असलेले नाव आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची दुसऱ्यांदा सूत्रे आपल्या हाती घेतल्यानंतर धक्कादायक निर्णय घेण्यास सुरूवात केली. भारतावर 50 टक्के टॅरिफ डोनाल्ड ट्रम्प यांनी लावला. यासोबतच भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, याकरिता भारतावर मोठा दबाव टाकण्याचे काम डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून इराणवर हल्ला करणार असल्याचे सांगताना दिसत आहेत. शेजारी छोट्या देशांवर त्यांच्याकडून अतिक्रमण केले जात आहे. डोनाल्ड ट्रम्प कधी काय बोलती आणि कधी काय निर्णय घेतलील याचा अजिबातच नेम नाही. भारत आणि अमेरिकेत कायमच चांगले संबंध राहिले आहेत. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे दोन्ही देशातील संबंध तणावात आहेत. डोनाल्ड ट्रम्प नेहमीच बोलताना म्हणतात की, पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे खूप चांगले मित्र आहेत. पण सध्या काही मुद्द्यांमध्ये ते माझ्यावर नाराज आहेत.

नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांनी एक धक्कादायक विधान केले, ज्याने खळबळ उडाली. अमेरिकेत मोठा वाद निर्माण झाला. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की,  त्यांनी डग बर्गम यांची अमेरिकेचे गृहमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे कारण त्याची पत्नी कॅथरीन बर्गम आकर्षक आणि सुंदर वाटली म्हणून. डोनाल्ड ट्रम्प  यांचे हे बोलणे ऐकून फक्त अमेरिकाच नाही तर जगभरात मोठी खळबळ उडाली.

एका कार्यकारी आदेशावर सही करण्यासाठी ओव्हल ऑफिसमध्ये आयोजित कार्यक्रमादरम्यान ट्रम्प यांनी थेट विधान केले. डोनाल्ड ट्रम्प स्पष्ट शब्दात कॅमेऱ्याच्या पुढे बोलताना म्हटले की, ज्या व्यक्तीची पत्नी इतकी सुंदर आणि आकर्षक आहे, त्याला ते नोकरी देणार आहेत. कॅथरीन बर्गमकडे बोट दाखवत त्यांनी असेही म्हटले, ज्याच्याकडे अशी पत्नी आहे तो कौतुकास पात्र आहे.

कॅथरीन बर्गम याच्याकडे इतकी सुंदर आणि आकर्षक पत्नी असल्यानेच मी त्याला मंत्रीपद दिले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधाानाने मोठी खळबळ उडाली. आता डोनाल्ड ट्रम्प यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केल्याचेही बघायला मिळत आहे.

देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?.
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार.
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली.
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.