
अत्यंत प्रतिष्ठीत अशा नोबेल पुरस्कारांची घोषणा सोमवारी करण्यात आली. वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक तिघा डॉक्टरांना संयुक्त रुपाने जाहीर करण्यात आले आहे. अमेरिकेच्या मॅरी ई ब्रुंको, सॅन फ्रान्सिस्कोच्या फ्रेड रॅम्सडेल आणि जपानच्या शिमोन साकागुची यांना यंदाचा वैद्यक क्षेत्रातील नोबेल पुरस्कार संयुक्तरुपाने जाहीर करण्यात आला आहे.
या तिघांनी Peripheral Immune Tolerance ( परिधीय रोगप्रतिकारक सहनशीलता ) वर संशोधन केले आहे. या संशोधनाने इम्युन सिस्टीममध्ये गडबड झाल्याने होणारे आजार,त्यांची ओळख आणि उपचार चांगल्या पद्धतीने करण्यात मदत मिळणार आहे. या संशोधनातून कळाले की इम्युन सिस्टीमला कसे नियंत्रित करता येईल ज्यामुळे शरीराच्या कोणत्याही भागाला सुरक्षित ठेवता येईल.
यामुळे अखेर Peripheral Immune Tolerance म्हणजे काय ? ज्यामुळे या संशोधनास नोबेल प्राईज देण्यात आले आहे. या संदर्भात तज्ज्ञांनी बोलताना त्यांनी दिलेली माहिती काय ते पाहूयात..
इम्युन सिस्टीम आपल्या शरीरातला एक सैनिक असतो. जो आपल्याला आजार आणि संक्रमणापासून वाचवत असतो. इम्युन सिस्टीम जेवढी चांगली तेवढे आजारी पडण्याची शक्यता कमी असते. परंतू काही वेळा शरीर चुकून आपल्या पेशींवर हल्ला करु लागते. यामुळे अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. त्यांनी कमी प्रभावाचे ऑटो इम्युन डिसिज म्हटले जाते. उदा. रुमेटाईड आर्थरायटिस आणि ल्युपस आजार असे दिल्लीच्या आरएमएल हॉस्पिटलमधील मेडिसिन विभागाचे संचालक प्रोफेसर डॉ. सुभाष गिरी यांनी स्पष्ट केले.
डॉ. सुभाष पुढे म्हणाले की Peripheral Immune Tolerance वरील संशोधनाने हे कळेल की ऑटो इम्युन आजारांवर उपचार कसे केले जातात.आणि शरीर आपल्याच पेशींवर हल्ला का करु लागते ? ऑटो इम्युन आजारांवर कोणताही उपचार नसल्याने हे संशोधन अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. यामुळे भविष्यात ऑटो इम्युन आजारांपासून कायमरुपी उपचार करण्यास मदत मिळू शकते. या संशोधनाच्या आधारामुळे अनेक ऑटो इम्युन डिसीजवर उपचार देखील शोधले जात आहेत.
पेरिफेरल इम्यून टॉलरन्स आपल्या शरीरातील एक सुरक्षा प्रणाली आहे. जी इम्युनिटीला आपल्या पेशींवर हल्ला करण्यापासून रोखते. परंतू ही काही प्रकरणात योग्य काम करत नाही. आणि इम्युनिटी स्वत:च पेशींवर हल्ला करु लागते असे जीटीबी हॉस्पिटलच्या मेडिसिन विभागाचे डॉ. अजित कुमार यांनी सांगितले.
कुमार पुढे सांगतात की पेरिफेरल इम्यून टॉलरन्स तीन पद्धतीने काम करते. यात एनर्जी सप्रेशन आणि Apoptosisचे काम होते. जर कोणता T-cell शरीराच्या स्वत:च्या पेशींना ओळखतो परंतू त्याला सिग्नल मिळत नाही, तेव्हा तो निष्क्रीय होऊन जातो. जर पेरिफेरल टॉलरन्स योग्य तऱ्हेने काम करत नसेल तर शरीर स्वत:च्या पेशींना बाहेरचा शत्रू समजतो आणि यामुळे आजार होतात. उदा. डायबिटीजमध्ये इम्युन सिस्टीम पॅनक्रियासच्या पेशींना नष्ट करत असतो आणि ऑररुमेटॉईड आर्थराईटिसमध्ये शरीर आपल्याच सांध्यांवर हल्ला करत असते.
संतुलित आहार घ्या, आणि आपल्या डाएटमध्ये प्रोटीन, हिरव्या भाज्या आणि मोसमी फळांचा समावेश करा.
विटामिन-D आणि ऊन : रोज थोडे उन्हात चाला
रोज किमान आठ ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे.
रोज 7 ते 8 झोप घ्या