PHOTOS : ‘या’ देशात शेकडोंचा जीव घेणाऱ्या ज्वालामुखीचा पुन्हा स्फोट, लाव्हारस थेट रस्त्यावर, हजारो लोक बेघर

| Updated on: May 23, 2021 | 11:25 PM

ज्वालामुखीचा स्फोट इतका मोठा होता की त्यातील लाव्हारस अक्षरशः रस्त्यांवर वाहत आला. त्यामुळे शहरात भीतीचं वातावरण तयार झालं.

1 / 6
कांगो (Democratic Republic of Congo) देशाच्या गोमा शहरजवळ शनिवारी (22 मे) माउंट नीरागोंगो (Mount Nyiragongo)  ज्वालामुखीचा स्फोट झाला. यामुळे आकाशात लाल रंगाचं सावट तयार झालं. हा ज्वालामुखीचा स्फोट इतका मोठा होता की त्यातील लाव्हारस अक्षरशः रस्त्यांवर वाहत आला. त्यामुळे शहरात भीतीचं वातावरण तयार झालं. अनेक लोकांना आपलं घर सोडावं लागलंय.

2 / 6
प्रत्यक्षदर्शींनी गोमा येथे राष्ट्रीय महामार्गावर लाव्हारस आल्याचं सांगितलं. ज्वालामुखीच्या स्फोटात किती लोकांना आपला प्राण गमवावा लागला याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. स्थानिक प्रशासनाने या भागातील नागरिकांना दुसरीकडे स्थलांतरीत होण्याच्या सुचनाही दिल्या नसल्याचा आरोप होतोय.

3 / 6
हा ज्वालामुखीचा 12 वर्षांपूर्वी म्हणजे 2002 मध्ये स्फोट झाला होता. तेव्हा येथे शेकडो लोकांना जीव गमवावे लागले. याचा लाव्हारस विमानतळाच्या धावपट्टीपर्यंत गेला होता (Goma Volcano Eruption 2002).

4 / 6
संयुक्ती राष्ट्राच्या शांती मिशनने म्हटलं आहे, "ज्वालामुखीतील लाव्हारस गोमा शहराच्या दिशेने जात आहे." ज्वालामुखीच्या स्फोटाने दहशत निर्माण झाली असून हजारो लोक आपलं घर सोडून सुरक्षित ठिकाणी आसरा शोधत आहेत (Goma Volcano Congo).

5 / 6
याआधी आईसलँडमध्ये देखील ज्वालामुखी स्फोटाची घटना घडली होती. तेथे मार्च महिन्यात ज्वालामुखी स्फोट झाला (Goma Volcano Eruption). तेव्हापासून तेथे लाव्हारस आणि राखेचं साम्राज्य आहे (Goma City Volcano). तेथे तर लोक ज्वालामुखीच्या लाव्हारसावर जेवण शिजवताना दिसले.

6 / 6
हा ज्वालामुखी रेयकजाविकच्या पश्चिमेला असलेल्या रेयकजानेस बेटावर आहे (Goma DRC Volcano). आता हा परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित केला जाईल असंही बोललं जातंय. ज्या जमिनीवर लाव्हारस  आहे त्या जमिनीचे 20 मालक आहेत. त्यांनी जमीन विकण्याचं ठरवलंय.