
विमान अपघाताच्या घटनेंमध्ये दिवसेंदिवस मोठी वाढत होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 2025 मध्ये अनेक भीषण विमान अपघाताच्या घटना घडल्या आहेत. गेल्या सात महिन्यांमध्ये विमान अपघातात तब्बल 499 लोकांचा मृत्यू झाला आहे. आज रशियामध्ये एक मोठा विमान अपघात झाला, अपघातग्रस्त विमानामध्ये 49 लोक होते, या अपघातात या सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान रशियामध्ये घडलेल्या या विमान अपघाताची घटना ताजी असतानाच आता इटलीमधून देखील मोठी बातमी समोर येत आहे. इटलीमध्ये भीषण विमान अपघात झाला आहे. या अपघाताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्यावर प्रंचड गर्दी आहे, वाहनांच्या रांगा लागल्या आहेत, याचवेळी एक विमान महामार्गावर कोसळलं.
हे विमान महामार्गावर कोसळताच त्याला भीषण आग लागली, कारचालकाला आपल्या कारवर नियंत्रण न मिळवता आल्यानं एक कार तर थेट या आगीत घुसल्याचं पाहायला मिळालं. मात्र त्यानंतर ही कार सुरक्षितरित्या पुढे निघाल्याचं या व्हिडीओमधून दिसून येत आहे. या विमानामध्ये दोन व्यक्ती होते, त्यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे, तर अनेक जण या अपघातामध्ये जखमी झाले आहेत. जखमींचा नेमका आकडा अजून समोर आलेला नाहीये.
🚨 BREAKING: Tragedy in Italy — A plane has crashed onto a highway near Brescia, colliding with several vehicles. At least 2 people confirmed dead. pic.twitter.com/iT3JRquCpX
— War Doctrine (@wardoctrine_) July 23, 2025
दुसरीकडे आज रशियामध्ये देखील भीषण अपघात झाला आहे, या अपघातामध्ये 49 लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यापूर्वी बांग्लादेशमध्ये देखील एक विमान शाळेवर कोसळलं होतं.
त्यापूर्वी अहमदाबादमध्ये देखील विमानाचा भीषण अपघात झाला होता, विमानानं उड्डाण करताच ते काही क्षणात एका मेडीकल कॉलेजच्या होस्टलच्या इमारतीवर कोसळलं, या अपघातामध्ये तब्बल 260 जणांनी आपला जीव गमावला होता. 2025 मध्ये आतापर्यंत 499 जणांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे, विमान अपघाताच्या घटना वाढतच असल्याचं पाहायला मिळत आहे.