
इराणचे युद्ध सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संयुक्त अरब अमिरातचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी मोदी यांनी त्यांना ईदच्या आगाऊ शुभेच्छाही दिल्या. दोन्ही नेत्यांमध्ये पश्चिम आशियातील तणावा संदर्भात चर्चा झाली. भारताने संयु्क्त अरब अमिरातवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. पीएम मोदी यांनी युएईच्या राष्ट्राध्यक्षासोबत केलेल्या चर्चेचा तपशिल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर देखील पोस्ट केला आहे.
इराणच्या युद्धामुळे होर्मुज स्ट्रेटमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. येथील जहाजांची सुरक्षा आणि निर्धोक वाहतूक सुरु व्हावी यासंदर्भातही युएईच्या राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्याशी चर्चा केली. तसेच या क्षेत्रातील शांतता, सुरक्षा आणि स्थिरता लवकरच बहाल करण्यासाठी एकत्र मिळून काम सुरुच ठेवण्याचा निर्धारही उभय नेत्यांनी व्यक्त केला आहे.
पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर या फोनवरील चर्चेसंदर्भात पोस्ट केली आहे. पंतप्रधान लिहितात मी संयुक्त अरब अमिरातच्या राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्या चर्चा केली आणि त्यांना ईदच्या आगाऊ शुभेच्छा दिल्या. आम्ही पश्चिम आशियातील सध्याच्या स्थितीवर चर्चा केली.’
पंतप्रधान यांनी सांगितले की आम्ही संयुक्त अरब अमिरातवर झालेल्या हल्ल्याचा भारताच्या वतीने कठोर शब्दात निषेध केला आहे. ज्यात निर्दोष लोकांचा प्राण गेला आणि पायाभूत सुविधांना नुकसान पोहचले आहे. आम्ही होर्मुज सामुद्रधुनी मध्ये सुरक्षित आणि निर्धोक नौकानयन सुरु व्हावे यावर सहमती व्यक्त केली. आम्ही या क्षेत्रात शांतता, सुरक्षा आणि स्थिरतेची लवकर बहालीसाठी मिळून काम सुरुच ठेवू’.
येथे पाहा पोस्ट –
Spoke with my brother HH Sheikh Mohamed bin Zayed Al Nahyan, President of the UAE and conveyed advance Eid greetings.
We discussed the current situation in West Asia. Reiterated India’s strong condemnation of all attacks on the UAE that have resulted in loss of innocent lives…
— Narendra Modi (@narendramodi) March 17, 2026
या आधी सरकारने त्या बातम्यांचे खंडन केले आहे. ज्यात म्हटले होते की होर्मुज स्ट्रेटमधून भारतीय ध्वजाच्या जहाजांना सुरक्षित मार्ग निश्चित करण्याच्या बदल्यात भारताद्वारा जप्त केलेल्या तीन तेल टँकरना सोडण्याची मागणी इराण करत आहे. मात्र सरकारच्या शीर्षस्थ सूत्रांनी सांगितले की या बातम्या निराधार आहेत. भारत आणि इराणच्या अधिकाऱ्यात या संदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचे या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
भारत होर्मुज स्ट्रेटमधून येणाऱ्या २० हून अधिक भारतीय ध्वज असलेल्या व्यापारी जहाजांना सुरक्षित आणण्यासाठी तेहराणच्या संपर्कात आहे. दोन्ही पक्षात या संदर्भात झालेल्या बोलणीनंतर शनिवारी पहाटे भारतीय ध्वज लावलेले दोन एलपीजी वाहक जहाज शिवालिक आणि नंदा देवी मधून ९२,७१२ मेट्रीक टन एलपीजी होर्मुज स्ट्रेटमधून पुढे भारताकडे सरकला आहे.