PM Modi Meet Fauda Cast : नेटफ्लिक्सवर गाजणाऱ्या वेबसीरीजच्या स्टार्सना इस्रायलमध्ये भेटल्यावर मोदींनी लिहिलं, बरं झाल हे…

PM Modi Meet Fauda Cast : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दुसरा इस्रायल दौरा होता. याआधी 2017 साली ते इस्रायल दौऱ्यावर गेले होते. इस्रायलचा दौरा करणारे ते पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत. यंदाच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रायलमधील वेगवेगळ्या मान्यवरांची भेट घेतली.

PM Modi Meet Fauda Cast : नेटफ्लिक्सवर गाजणाऱ्या वेबसीरीजच्या स्टार्सना इस्रायलमध्ये भेटल्यावर मोदींनी लिहिलं, बरं झाल हे...
PM Modi Meet Fauda Cast
Image Credit source: X @narendramodi
| Updated on: Feb 27, 2026 | 4:35 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच दोन दिवस इस्रायल दौऱ्यावर गेले होते. 25 आणि 26 फेब्रुवारी. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं इस्रायलमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पोप यांना जो मान मिळतो, तोच आदर, सन्मान पीएम मोदींना तिथे मिळाला. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू सर्व प्रोटोकॉल मोडून स्वत: जातीने पंतप्रधान मोदींच्या स्वागताला विमानतळावर उपस्थित होते. पंतप्रधानांनी त्यांच्या या दोन दिवसीय दौऱ्यात इस्रायली संसद ‘नॅसेट’ ला संबोधित केलं. हा मान मिळवणारे नरेंद्र मोदी भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दुसरा इस्रायल दौरा होता. याआधी 2017 साली ते इस्रायल दौऱ्यावर गेले होते. इस्रायलचा दौरा करणारे ते पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत.

यंदाच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रायलमधील वेगवेगळ्या मान्यवरांची भेट घेतली. इस्रायली मुलांसोबत त्यांनी वेळ घालवला. यावेळी इस्रायली चित्रपट सृष्टीतील कलाकार सुद्धा मोदींच्या भेटीसाठी आले होते. काल गुरुवारी नेटफ्लिक्सवरील इस्रायली वेब सीरीज ‘फौदा’ च्या कलाकारांनी पीएम मोदी यांची भेट घेतली.फौदाच्या स्टारकास्टला भेटल्यानंतर पीएम मोदींनी त्यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मिडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केलाय. ‘बरं झालं या भेटीसाठी फक्त एका सेल्फीची गरज होती, कुठल्या अंडरकव्हर मिशनची नाही’ असं पंतप्रधान मोदींनी गंमतीने लिहिलय.

एका खास अंडरकव्हर टीमची गोष्ट

‘फौदा’ ही इस्रायली वेब सीरीज आहे. इस्रायली डिफेन्स फोर्सेसच्या अनुभवावरुन प्रेरणा घेऊन ही वेब सीरीज बनवण्यात आलीय. नेटफ्लिक्सवर ही वेब सीरीज तुम्ही पाहू शकता. या सीरीजमध्ये Lior Raz, Hisham Sull, Lior Raz, Hisham Sulliman आणि Itzik Cohen यांच्या मुख्य भूमिका आहेत. अवॉर्ड विनिंग स्पाई-थ्रिलर शो मध्ये एका खास अंडरकव्हर टीमची गोष्ट आहे. भारतात ही वेब सीरीज खूप लोकप्रिय आहे. ‘Tanaav’ हा या वेब सीरीजचा हिंदी रिमेक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 1953 मध्ये बनवलेल्या इस्रायली होलोकॉस्ट मेमोरियल Yad Vashem चा दौरा केला.

 

 

Follow Us