
तुर्की (Turkey) या देशातील मरमारा समुद्राची (Sea of Marmara) अवस्था इतकी वाईट झालीय की त्याचे फोटो पाहून हा समुद्र असल्याचा कुणाचा विश्वास बसणार नाही. काही जण तर हे दुसऱ्या ग्रहावरील फोटो आहेत का अशीही विचारणा करत आहेत.

याचं कारण आहे प्रदुषणामुळे या समुद्रातील पाण्यावर आलेला 'समुद्री स्नोट'चा (Sea Snot) थर. या थरामुळे समुद्री जीवन आणि मासेमारीचा व्यवसाय धोक्यात आलाय. त्यामुळेच तुर्की सरकारने या समुद्राच्या स्वच्छतेसाठी मोहिम सुरू केलीय.

समुद्री स्नोट हा एक चिकट समुद्री पदार्थ आहे. जलवायु परिवर्तन आणि जल प्रदुषणामुळे पाण्यातील शेवाळाचं प्रमाण अधिक होतं. हे शेवाळ पाण्यातील पोषक द्रव्य खातं आणि हा चिकट पदार्थ तयार होतो.

तुर्कीचे पर्यावरण मंत्री मूरत कुरुम म्हणाले, "समुद्राच्या पृष्ठभागावरील स्वच्छता करण्यासाठी 25 बोट आणि 18 इतर जहाजं काम करत आहेत. अवैध मासेमारी आणि जाळे लावण्यासाठी देखील बंदी घालण्यात आलीय."

तुर्कीने 2021 च्या अखेरपर्यंत मरमारा समुद्राला को एक संरक्षित स्थान म्हणून जाहीर करणार असल्याचंही स्पष्ट केलंय.

जलवायु परिवर्तन आणि प्रदुषणामुळे समुद्रात शेवाळ आणि स्नॉटची (चिकट पदार्थ) वाढ होत आहे, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिलाय. पोषकतत्वांनीयुक्त दुषित पाणी समुद्राच्या पाण्यात सोडलं की समुद्रात शेवाळ आणि या स्नॉटची वाढ होते.

तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेचेप तय्यप एर्दोगन (Recep Tayyip Erdogan) यांनी समद्रातील या स्नोटसाठी अस्वच्छ पाणी समुद्रात सोडण्यास जबाबदार धरलं आहे. तसेच हे प्रदुषण संपवण्याचाही प्रण घेतलाय.