AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घानाचा सर्वोच्च नागरिक सम्मान

घानाचे राष्ट्रपती महामा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घानाचा सर्वोच्च नागरी सन्मान 'द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना' देऊन सन्मानित केले. पंतप्रधान मोदी यांनी हा सन्मान भारतातील नागरिकांना समर्पित केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घानाचा सर्वोच्च नागरिक सम्मान
| Updated on: Jul 03, 2025 | 9:04 AM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच देशांच्या दौऱ्यावर गेले आहेत. बुधवारी दोन दिवसांच्या दौऱ्यावर घाना येथे पोहोचले. घानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जोरदार स्वागत झाले. घानाचे राष्ट्रपती जॉन ड्रामानी महामा यांनी विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गार्ड ऑफ ऑनरसह २१ तोफांची सलामी देण्यात आली. मोदी यांचा हा पहिलाच घाना दौरा आहे. तीन दशकांत पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधान घानाला भेट देत आहेत.घानामध्ये पंतप्रधान मोदींना ‘द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना’ या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.

पंतप्रधान काय म्हणाले?

राजधानी अक्रा येथे एका कार्यक्रमादरम्यान घानाचे राष्ट्रपती महामा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घानाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना’ देऊन सन्मानित केले. पंतप्रधान मोदी यांनी हा सन्मान भारतातील नागरिकांना समर्पित केला आणि या सन्मानाबद्दल घानाचे आभार मानले. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, घानाचा राष्ट्रीय सन्मान मिळणे ही माझ्यासाठी खूप अभिमानाची आणि सन्मानाची गोष्ट आहे. मी राष्ट्रपती महामा, घाना सरकार आणि घानाच्या जनतेचे मनापासून आभार मानतो. मी १.४ अब्ज भारतीयांच्या वतीने हा सन्मान नम्रपणे स्वीकारतो. मी हा सन्मान आपल्या तरुणांच्या आकांक्षा, त्यांच्या उज्ज्वल भविष्याला आपल्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेला आणि परंपरांना आणि भारत आणि घाना यांच्यातील ऐतिहासिक संबंधांना समर्पित करतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्यात त्यांनी म्हटले की, घानात ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घानाने पुरस्कार मिळाला. त्याबद्दल घाना सरकारला मी धन्यवाद देतो. भारत सदैव घानातील लोकांसोबत उभा राहणार आहे. एक विश्वासू मित्र आणि विकास भागीदार म्हणून योगदान देत राहणार आहे.

महाना यांना भारत भेटीचे निमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घानाचे राष्ट्रपती जॉन ड्रामानी महामा यांच्याशी बैठक घेतली. चर्चेनंतर भारतीय आणि घानाच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही देशांमधील चार करारांवर स्वाक्षरी केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, राष्ट्रपती महामा आणि मी भारत आणि घाना यांच्यातील द्विपक्षीय भागीदारीचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती महाना यांना भारतात येण्याचे निमंत्रण दिले.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.