इथिओपियन संसदेत पंतप्रधान मोदींचे जोरदार भाषण, थेट म्हणाले, भारत आणि..

काही दिवसांपूर्वी भारत दाैऱ्यावर रशियाचे अध्यक्ष पुतिन आले होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इथिओपियाच्या दाैऱ्यावर आहेत. यावेळी ते इथिओपियन संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना दिसले. त्यांनी दोन्ही देशातील संबंधांवर थेट भाष्य केले.

इथिओपियन संसदेत पंतप्रधान मोदींचे जोरदार भाषण, थेट म्हणाले, भारत आणि..
Narendra Modi
| Updated on: Dec 17, 2025 | 4:49 PM

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इथिओपियाच्या दाैऱ्यावर आहेत. त्यांच्या या दाैऱ्याकडे संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या आहेत. यावेळी ते इथिओपियन संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना दिसले. यादरम्यान त्यांनी भारताच्या ‘वंदे मातरम’ या राष्ट्रगीतामध्ये आणि इथिओपियाच्या राष्ट्रगीतामध्येही आपल्या भूमीला माता म्हणून संबोधले जाते, असे सांगितले. पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, ते आपला वारसा, संस्कृती आणि सौंदर्याचा अभिमान बाळगण्याची आणि आपल्या मातृभूमीचे संरक्षण करण्याची प्रेरणा देतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इथिओपियन संसदेत आगमन झाल्यावर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. विशेष बाब म्हणजे ही जगातील 18 वी संसद आहे जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करताना दिसले. यापूर्वी त्यांनी 17 देशाच्या संसदेत भाषण केली. इथिओपियनमध्ये नरेंद्र मोदी यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत भाषण करताना म्हटले की, आज तुमच्यासमोर उभे राहणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान नक्कीच आहे. सिंहांची भूमी असलेल्या इथिओपियामध्ये येऊन खूप छान वाटत आहे. मी इथे आल्यापासून मला आपलेपणा वाटत आहे. त्याचे कारणही मोठे आहे कारण माझे जे राज्य आहे गुजरात ते देखील सिंहांचे घर आहे. आधुनिक आकांक्षा यांचा संगम असलेल्या देशातील लोकशाहीच्या मंदिरात उपस्थित राहणे हा त्यांच्यासाठी मोठा सन्मान आहे.

पुढे बोलताना मोदींनी म्हटले, देशाचा प्राचीन इतिहास आणि आधुनिक आकांक्षा यांच्यातील संतुलन हीच इथिओपियाची खरी ताकद आहे. भारत आणि इथिओपिया या दोन देशातील संबंधांवर बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत आणि इथिओपिया हवामान आणि भावना या दोन्ही बाबतीत उबदारपणाची भावना जपतात. आपल्या पूर्वजांनी विशाल महासागरांवरून संबंध प्रस्थापित केले. व्यापारी मसाल्याचे पदार्थ आणि सोने घेऊन हिंदी महासागरातून प्रवास करत होते. पण त्यांनी केवळ वस्तूंचीच नव्हे, तर त्याहूनही अधिक गोष्टींची देवाणघेवाण केली.

फक्त वस्तूंचीच देवाणघेवाण नाही तर त्यांनी आपल्या विचारसरणीची आणि जीवनशैलीचीही देवाणघेणाव केली.
आदिस आणि धोलेरासारखी बंदरे केवळ व्यापारी केंद्रेच नव्हती तर ती संस्कृतींमधील सेतू होती. आधुनिक काळात, आपले संबंध एका नव्या युगात प्रवेश करत आहेत, असेही नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणावेळी म्हटले. दोन्ही देशातील संबंध कित्येक वर्षांपासून आहेत, हे सांगताना मोदी दिसले.