मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून भारताचा मोठा निर्णय, थेट ‘या’ देशासोबत करणार करार

अमेरिकेकडून भारतावर दबाव वाढत असतानाच आता मोठा आणि नवा निर्णय भारताकडून घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जपानच्या दाैऱ्यावर आहेत. यादरम्यान काही मोठे निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. यासोबत नरेंद्र मोदी हे चीनच्या दाैऱ्यावर देखील जाणार आहेत.

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून भारताचा मोठा निर्णय, थेट या देशासोबत करणार करार
donald trump and narendra modi
| Updated on: Aug 29, 2025 | 9:12 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जपानच्या दाैऱ्यावर आहेत. जपानमध्ये त्यांचे भव्य असते स्वागत करण्यात आलंय. भारताने अमेरिकेवर 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या जपान दाैऱ्याची घोषणा करण्यात आली. हा अमेरिकेला मोठा धक्का आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जपानकडून भारतामध्ये मोठी गुंतवणूक ही केली जाणार आहे. भारत आणि जपानमधील भागीदारी अहमदाबाद-मुंबई हाय-स्पीड बुलेट रेल्वे प्रकल्पापुरती मर्यादित राहणार नाही, हे जगाला दाखवून देण्यात आलंय. आता दोन्ही देश मिळून बुलेट ट्रेनची निर्मिती करू शकतात.

रिपोर्टनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जपानमधून मोठी घोषणा देखील करू शकतात. दोन्ही देशांमधील आर्थिक आणि धोरणात्मक संबंध आणखी मजबूत होणार हे स्पष्ट आहे. हा प्रकल्प भारतीय वाहतूक व्यवस्थेत नवीन ऊर्जा निर्माण करू शकतो. भारताला पूर्वी E5 शिंकानसेन मिळण्याची अपेक्षा होती, ज्याचा कमाल वेग ताशी 320 किमी आहे. शिंकानसेनची रचना जपानच्या अल्फा-एक्स प्रायोगिक ट्रेनपासून विकसित करण्यात आली .

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा हे आज 29 ऑगस्ट रोजी टोकियो येथे होणाऱ्या वार्षिक शिखर परिषदेत भेटणार आहेत. दोन्हीजण यानंतर शिंकानसेनहून सेंदाईला जातील आणि तेथील सेमीकंडक्टर प्लांटला भेट देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिगेरू इशिबा यांच्या भेटीकडे संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या आहेत. मुळात म्हणजे अमेरिकेने मोठा टॅरिफ लावल्यानंतर भारताकडून अनेक देशांचे दाैरे केली जात आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जपानच्या दाैऱ्यावर असल्याने नक्कीच डोनाल्ड ट्रम्प यांची पोटदुखी उठली असेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर भारताने अनेक देशांसोबतची जवळीकता वाढवल्याचे बघायला मिळतंय. चीन आणि भारतातील संबंध मागील काही वर्ष ठीक नव्हते. मात्र, आता टॅरिफनंतर दोन्ही देशांमधील जवळीकता वाढल्याचे स्पष्टपणे बघायला मिळत आहे. रशियाकडून भारताने तेल खरेदी करणे बंद करावे यासाठी भारतावर विविध प्रकारे दबाव टाकल्याचे काम हे अमेरिकेकडून सुरू असल्याचे बघायला मिळत आहे.