AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जग हादरलं! भारताने घेतला रशियाच्या तेल खरेदीबद्दल अखेर मोठा निर्णय, डोनाल्ड ट्रम्प यांच्या…

भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लावला आहे. सातत्याने भारतावर दबाव टाकण्याचे काम अमेरिकेकडून सुरू आहे. शेवटी आता भारताने रशियाच्या तेल खरेदीबाबत एक अत्यंत मोठा निर्णय घेतल्याचे बघायला मिळत आहे.

जग हादरलं! भारताने घेतला रशियाच्या तेल खरेदीबद्दल अखेर मोठा निर्णय, डोनाल्ड ट्रम्प यांच्या...
Donald Trump
| Updated on: Aug 29, 2025 | 8:26 AM
Share

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानेच आपण हा टॅरिफ लावल्याचे त्यांनी म्हटले. काहीही करून भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे बंद करावे यासाठी भारतावर दबाव टाकला जात आहे. जगात रशियाकडून सर्वाधिक तेल खरेदी करणारा चीन हा देश आहे. मात्र, अमेरिकेने चीनवर टॅरिफ लावण्याची हिंमत केली नाही. अमेरिकेच्या विरोधात अनेक देश पुढे येताना दिसत आहेत. भारत काहीही झाले तरीही अमेरिकेपुढे झुकणार नसल्याचे स्पष्ट आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना असे वाटले की, भारतावर इतका मोठा टॅरिफ लावल्यानंतर भारत लगेचच अटी मान्य करेल आणि तेल खरेदी करणे बंद करेल, असे अमेरिकेला वाटले होते. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नाही. उलट भारताकडून आता अमेरिकेला जोरदार धक्का दिला जाणार आहे. नुकताच मिळालेल्या रिपोर्टनुसार, सप्टेंबर महिन्यात भारत हा रशियाकडून जास्त तेल खरेदी करण्याच्या तयारीत आहे.

भारतीय रिफायनरी ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात 10 ते 20 टक्के अधिक रशियाकडून तेल खरेदी करणार आहे. रिपोर्टमध्ये हे सांगण्यात आलंय की, रशियाकडे सप्टेंबर महिन्यात अधिक तेल असणार आहे. काही दिवसांपूर्वीच युक्रेनकडून रशियाच्या 10 रिफायनरीवर हल्ला केला. युक्रेनसोबतच्या सुद्धादरम्यान 2022 मध्ये पश्चिमी देशांनी रशियाच्या तेलावर बहिष्कार टाकला. त्यावेळी भारत हा रशियाच्या बाजूने उभा राहिला आणि मोठ्या प्रमाणात तेल खरेदी केले.

त्यावेळीही अमेरिकेने यावर हस्तक्षेप घेतला होता. भारत हा रशियाकडून कच्चे तेल खरेदी करून त्यावर रिफायनरी करत आहे आणि मोठ्या प्रमाणात पैसे कमावत आहे, असा आरोप सातत्याने अमेरिकेकडून केला जात आहे. हेच नाही तर भारताला मोठी ऑफर देत अमेरिकेकडून सांगण्यात आले की, भारताने जर रशियाकडून तेल खरेदी करणे बंद केले तर त्यांच्यावरील 25 टक्के टॅरिफ आम्ही रद्द करू. आता भारताने टीका न करता रशियाकडून अधिक तेल खरेदी करत मोठा धक्का हा अमेरिका दिला आहे.

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा