
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज संध्याकाळी 5 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. अमेरिकेने टॅरिफनंतर H-1B व्हिसाबद्दल अत्यंत धक्कादायक निर्णय घेतला आहे. यामुळे अमेरिकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना धक्का बसला आहे. शिवाय जे भारतीय नागरिक अमेरिकेत नोकऱ्या करत आहेत, त्यांच्यामध्येही भीतीचे वातावरण बघायला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानंतर अनेकांनी विमानतळ गाठत अमेरिकेला तात्काळ जाण्याच्या निर्णय घेतला. अमेरिकेच्या H-1B व्हिसाचा फायदा जास्त करून भारतीय नागरिकच घेतात. मात्र, आता या व्हिसावर तब्बल 88 लाख रूपये शुल्क आकारण्याचा धक्कादायक असा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला. हा निर्णय भारतीयांसाठी अत्यंत धोक्याची घंटा आहे.
शिवाय अगोदरच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. या टॅरिफमुळे अमेरिकेत होणारी 70 टक्के निर्णयात कमी झाली. एका मागून एक मोठे धक्के अमेरिका भारताला देताना दिसत आहे. त्यामध्येच देशाला नरेंद्र मोदी हे संबोधित करणार आहेत. यादरम्यान नरेंद्र मोदी हे टॅरिफ आणि H-1B व्हिसाबद्दल भाष्य करतील, असे संकेत आहेत. अमेरिकेने घेतलेल्या निर्णयावर मोदी हे काय भाष्य करतात, याकडे जगाच्या नजरा आहेत.
भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवाली, याकरिता सतत भारतावर दबाव टाकण्याचे काम अमेरिकेकडून सुरू आहे. मात्र, भारताने अजूनही अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर नरेंद्र मोदी यांनी मोठे भाष्य करत स्वदेशी वस्तू वापरण्याचा मोठा सल्ला हा भारतीय नागरिकांना दिला आहे. आता ते व्हिसाबद्दल आणि अमेरिकेच्या धोरणाबद्दल भाष्य करू शकतात.
डोनाल्ड ट्रम्प हे भारतावर वेगवेगळे निर्बंध लादताना दिसत आहेत. मात्र, दुसरीकडे भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जवळीकता वाढवत आहेत. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. शिवाय त्यांनी म्हटले की, मी नरेंद्र मोदी यांना फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते चांगले काम करत असून माझे जवळचे मित्र आहेत.