
भारत आणि अमेरिकेत सध्या तणाव सुरू असून अनेक देश हे भारताच्या समर्थनार्थ मैदानात आली. भारताने अमेरिकेच्या टॅरिफच्या अटी मान्य केल्या नसल्यातरीही या अटी मान्य करण्यासाठी भारतावर मोठा दबाव आहे. आता अमेरिकेसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 29 ते 31 ऑगस्ट दरम्यान जपान दौऱ्यावर जात आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांचा हा दाैरा अत्यंत महत्वाचा मानला जातोय. टॅरिफमुळे भारताला फटका बसत आहे. हेच नाही तर याचा थेट भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे.
या संकटाच्या काळात जपानने भारताला उघडपणे पाठिंबा दिला. जपानने म्हटले आहे की, ते पंतप्रधान मोदींच्या भेटीदरम्यान $68 अब्ज खाजगी गुंतवणुकीचे वचन देणार आहे. हा भारतासाठी अत्यंत मोठा दिलासा म्हणावा लागेल. फक्त जपानच नाही तर या वाईट काळात भारतासोबत रशिया देखील उभा आहे. रशियाच्या बाजारपेठेत त्यांनी भारतीय वस्तूंची स्वागत करणार असल्याचे सांगत आयात वाढवणार असल्याचेही म्हटले.
जपानी माध्यमांच्या रिपोर्टनुसार, जपानकडून भारतात 68 अब्ज डॉलर्सची किंवा 10 ट्रिलियन येनची गुंतवणूक केली जाणार आहे. जपान आणि भारत दोघेही इंडो पॅसिफिक प्रदेश खुला करण्यासाठी एकत्र काम करत आहेत.
जपानी सरकारच्या सूत्रांच्या रिपोर्टनुसार, जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील बैठकी अगोदर चर्चा होईल आणि त्यानंतर नेमक्या गुंतवणूकीचा स्पष्ट आकडा हा पुढे येईल.
दोन्ही देशांकडून ही गुंतवणूक आणि पुढे धोरण ठरवली जाणार आहेत. अमेरिकेकडून भारतावर टॅरिफ लावल्यानंतर अनेक देश हे भारताच्य मदतीला येताना दिसत आहेत. अमेरिका भारताला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहे. या काळात भारताचे मित्र देश हे मदतीला धावून येत आहेत. जपानमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काय घोषणा करतात हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. नरेंद्र मोदी यांचा जपानचा दाैरा जाहीर झाल्यानंतर अमेरिकेला धक्का बसला आहे. भारत अमेरिकेच्या विरोधात रणनीती आखताना आता दिसत आहे. 50 टक्के टॅरिफ अमेरिकेकडून भारतावर लावण्यात आला आहे.